Asia cup 2025 – सामना सुरू असताना श्रीलंकेच्या स्टार खेळाडूच्या वडिलांचं निधन; कोच, टीम मॅनेजरनं सावरलं

Asia cup 2025 – सामना सुरू असताना श्रीलंकेच्या स्टार खेळाडूच्या वडिलांचं निधन; कोच, टीम मॅनेजरनं सावरलं

आशिया कप 2025 मध्ये गुरुवारी श्रीलंका आणि अफगाणिस्तान याच्यात सामना खेळला गेला. हा सामना सुरू असताना श्रीलंकेचा फिरकीपटू दुनिथ वेलालागे याच्या वडिलांचे निधन झाले. सामना संपल्यानंतर टीम मॅनेजर आणि मुख्य प्रशिक्षक सनथ जयसूर्या यांनी त्याला ही बातमी दिली. वडिलांच्या मृत्युची बातमी कळताच दुनिथला धक्का बसला आणि त्याचा अश्रू अनावर झाले. या दु:खाच्या प्रसंगात जयसूर्या आणि टीम मॅनेजर दुनिथसोबत खंबीरपणे उभे राहिले आणि त्याला सावरले. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

श्रीलंकेचा युवा खेळाडू दुनिथ वेलालागे हा आशिया चषकातील पहिलाच सामना खेळत होता. या लढतील श्रीलंकेने विजय मिळवला. पण काही क्षणात हा आनंद शोकाकूल वातावरणामध्ये बदलला. सामना संपल्यानंतर मुख्य प्रशिक्षक सनथ जयसूर्या आणि टीम मॅनेजरने मैदानात जाऊन दुनिथला ही दु:खद बातमी दिली. यानंतर लगेच दुनिथ स्टेडियमबाहेर धाव घेतली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Marathi Fire (@marathifire)

दरम्यान, या लढतीमध्ये दुनिथ वेलालागे याने चार षटकांची गोलंदाजी करत 1 विकेट मिळवली. अफगाणिस्तानच्या डावातील विसावे षटकही त्याने टाकले. मात्र या षटकामध्ये अफगाणिस्तानचा अनुभवी खेळाडू मोहम्मद नबी याने त्याला सलग पाच षटकार ठोकले, मात्र याच षटकात दुनिथने त्याला बादही केले.

दुनिथच्या वडिलांच्या निधनाचे वृत्त ऐकून मोहम्मद नबी याला धक्का बसला. त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत दुनिथच्या वडिलांना श्रद्धांजली वाहिली आणि या दु:खद प्रसंगी खंबीर राहा असे म्हटले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

निवडणूक आयोगाची कारवाई; ४७४ गैर-मान्यता प्राप्त पक्षांना केले डीलिस्ट, महाराष्ट्रातीलही ४४ पक्षांचा समावेश निवडणूक आयोगाची कारवाई; ४७४ गैर-मान्यता प्राप्त पक्षांना केले डीलिस्ट, महाराष्ट्रातीलही ४४ पक्षांचा समावेश
केंद्रीय निवडणूक आयोगाने ४७४ राजकीय पक्षांची नोंदणी रद्द केली आहे. यात महाराष्ट्रातील ४४ पक्षांचाही समावेश आहे. याशिवाय, ३५९ इतर पक्षांविरुद्धही...
फडणवीस, निवडणूक आयोगाची दलाली बंद करा; हर्षवर्धन सपकाळ यांनी फटकारले
Crime News – आधी डोळ्यात मिरची पावडर घातली अन् नंतर चाकूने वार, हैवान बापाने 24 वर्षांच्या लेकीला संपवलं
माझ्या विरोधात बातम्या देणाऱ्या चॅनेलचे परवाने रद्द होऊ शकतात! ट्रम्प यांचा टीव्ही चॅनेलना इशारा, अमेरिकेत चौथास्तंभ धोक्यात
गच्चीवरून कोसळला, रुग्णवाहिका 5 तास वाहतूककोंडीत अडकल्याने वसईच्या दोन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू
Snake Bite Tips : सापाचा दंश होताच अगोदर करा हे काम, घरीच वाचेल प्राण! डॉक्टरांचा रामबाण उपाय काय?
निवडणूक आयोगाचा चौकीदार जागा होता, त्याने चोरी पाहिली आणि चोरांना वाचवले! राहुल गांधी यांचा पुन्हा निशाणा