Crime News – आधी डोळ्यात मिरची पावडर घातली अन् नंतर चाकूने वार, हैवान बापाने 24 वर्षांच्या लेकीला संपवलं

Crime News – आधी डोळ्यात मिरची पावडर घातली अन् नंतर चाकूने वार, हैवान बापाने 24 वर्षांच्या लेकीला संपवलं

मध्य प्रदेशात बापानेच आपल्या 24 वर्षांच्या लेकीचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रथम डोळ्यात मीरची पावडर घातली आणि त्यानंतर चाकून भोसकून नराधमाने लेकीचा खून केला आहे. या घटनेमुळे सारा परिसर हादरून गेला आहे. पोलिसांनी याप्रकरणी कारवाई करत आरोपी बदाम सिंग कुशवाहाला अटक केली आहे. टाईम्स ऑफ इंडियाने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

भोपाळ मधील ग्वाल्हेरच्या जनकगंड पोलीस स्टेशन हद्दीतील बेलदर का पुरा परिसरात गुरुवारी (18 सप्टेंबर 2025) ही खळबळजनक घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बदाम सिंग कुशवाहाला दारूचे व्यसन होते. यामुळे घरात सतत वाद होत होते आणि याच वादातून राणी कुशवाहाचा नाहक बळी गेला आहे. अपंग असलेला बदाम सिंगला दारूचे व्यसन होते. तसेच कोवीड पासून तो बेरोजगार होता. दारूसाठी स्वत:च्याच किराणा दुकानातून पैसे लंपास करत असल्याची माहिती त्याच्या पत्नीने दिली. त्याला थांबवण्याचा कोणी प्रयत्न केला, तर तो त्यांना मारत असे. मुलीला या गोष्टी पटत नव्हत्या त्यामुळे बाप-लेकीत खटके उडायचे. गुरुवारी सुद्धा बदाम सिंगने पैसे घेण्याच प्रयत्न केला, तेव्हा राणीने त्यावर आक्षेप घेतला असता बदाम सिंगने तिच्या डोळ्यात मिरची पावडर घातली आणि पोटात अनेक वेळा चाकूने भोसकलं. गोंधाळ आणि आरडाओरडा ऐकताच शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी आले आणि आरोपीला बेड्या ठोकल्या. अधिक तपास पोलीस करत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;