Brain Eating Amoeba : मेंदू खाणाऱ्या अमिबाची दहशत; 19 जणांचा घेतला बळी, पसरतो कसा, अगोदर घ्या ही काळजी
PAM infection in Kerala: केरळमध्ये PAM (Primary Amoebic Meningoencephalitis) संक्रमण वेगाने पसरत आहे. राज्यात या आजाराने 19 जणांचा बळी गेला. मेंदू खाणाऱ्या या अमिबाने कहर केला आहे. PAM संक्रमणाचे केरळमध्ये 61 प्रकरण समोर आली आहेत. PAM संक्रमणातील या अमिबाला नेग्लेरिया फाऊलेरी या नावाने ओळखले जाते. सामान्य भाषेत याला मेंदू खाणारा अमिबा असे म्हणतात.
मेंदू खाणारा अमिबा आहे काय?
केरळ सरकारने याविषयीची माहिती दिली. त्यानुसार, हा मेंदू खाणारा अमिबा मनुष्याच्या मज्जासंस्थेवर परिणाम करतो. हा संसर्ग मेंदूच्या ऊतींना नष्ट करतो. परिणामी मेंदूला गंभीर इजा होते आणि माणसाचा मृत्यू होतो. यामुळे मेंदूवर सूज येते आणि मग रुग्णाचा मृत्यू ओढावतो. पीएएम हा दुर्मीळ आजार आहे. पण अत्यंत घातक आहे. सध्या केरळमध्ये या रोगाने थैमान घातले आहे. याचा प्रादूर्भाव लहान मुलं, किशोरवयीन बालकं आणि तरुणांसह वृद्धांमध्ये अधिक दिसत आहे.
कसा होतो हा आजार?
नेग्लेरिया फाऊलेरी अमिबा हा तलाव आणि धरणाच्या ताज्या पाण्यात आढळून येतो. ज्या पाण्यात हा अमिबा असतो आणि ते पाणी लोकांच्या पिण्यात येते अथवा त्याच्या संपर्कात येते. तेव्हा त्याचा मोठा धोका उद्भवतो. हा अमिबा मानवात नाकावाटे शिरतो. दुषित पाण्यामुळे, तलावात, सांडव्यात आंघोळ करणाऱ्या माणसाला तो होण्याचा धोका वाढतो. अमिबा गरम पाण्यात पण राहतो. एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीत त्याचे संक्रमण अद्याप आढळलेले नाही. पाण्याद्वारेच तो पसरतो.
PAM आजाराची लक्षणं काय?
PAM आजाराची लक्षणं अगदी सामान्य असतात. डोकेदुखी,ताप, मळमळ होणे. उलटी होणे ही या आजाराची लक्षणं आहेत. पण अनेकदा ही सामान्य लक्षण दिसत असल्याने अनेकजण मेडिकलवरील पेनकिलर घेतात. पण तोपर्यंत उपचारासह उशीर होतो आणि मग मृत्यू दर वाढतो. हा आजार मानवी शरिरात झपाट्याने पसरतो. लवकर इलाज झाला नाही तर लगेच मृत्यू ओढावतो. आरोग्य यंत्रणांनी नागरिकांना या आजाराची लक्षण दिसल्यास तात्काळ उपचार घेण्याचे आवाहन केले आहे. या आजारात ताप, सर्दी, डोकेदुखी, मळमळ ही सामान्य लक्षणं दिसत असली तरी एकदा आरोग्य तज्ज्ञाचा सल्ला घ्या. महाराष्ट्रात अजून याविषयीची प्रकरण मोठ्या प्रमाणात समोर आली नाहीत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List