मोठा निर्णय! समान नावांमुळे होणारा गोंधळ टाळणार, ईव्हीएमवर उमेदवारांची रंगीत छायाचित्रे लावणार!!

मोठा निर्णय! समान नावांमुळे होणारा गोंधळ टाळणार, ईव्हीएमवर उमेदवारांची रंगीत छायाचित्रे लावणार!!

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत कशा प्रकारे मतचोरी केली याचा बॉम्ब फोडत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला चांगलाच दणका दिला आहे. यानंतर निवडणूक आयोग कामाला लागला आहे. उमेदवारांच्या समान नावांमुळे होणारा मतदारांचा गोंधळ टाळण्यासाठी ईव्हीएमवर उमेदवारांची रंगीत छायाचित्रे लावण्याचा निर्णय घेतला आहे.

निवडणूक आयोगाशी संगनमत करून भाजपने लोकसभा आणि महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत मतचोरी करून कशी सत्ता मिळवली हे राहुल गांधी यांनी पुराव्यानिशी सर्वांसमोर आणले आहे. यानंतर देशात सुरू असलेल्या निवडणूक घोटाळ्याविरुद्ध देशभरात वातावरण तापू लागले आहे. बिहारमध्ये मतदार यादी फेरसर्वेक्षणावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने एक मोठा निर्णय घेतला. ईव्हीएममध्ये आता उमेदवारांची रंगीत छायाचित्रे, त्यांची नावे आणि निवडणूक चिन्ह ठळकपणे प्रदर्शित केली जातील. निवडणूक आचारसंहिता नियम, 1961 च्या नियम 49 ब अंतर्गत या सुधारणा केल्या आहेत. याची सुरुवात बिहार विधानसभा निवडणुकीपासून होईल.

रंगीत छायाचित्रे, मोठे फॉण्ट आणि चांगल्या दर्जाचे कागद यामुळे त्यांना हव्या असलेल्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी ग्रामीण भागातील लोकांचा, वृद्धांचा गोंधळ उडणार नाही. यामुळे मतदानावरील मतदारांचा विश्वास वाढणार आहे. निवडणूक प्रक्रिया सुधारण्यासाठी आणि मतदारांची सोय वाढविण्यासाठी गेल्या सहा महिन्यांत राबविण्यात आलेल्या 28 उपाययोजनांचा हा एक भाग आहे, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

डय़ुप्लिकेट उमेदवारांना लगाम

निवडणूक आली की समोरच्या उमेदवाराची मते फोडण्यासाठी एकसारख्या नावाचे डय़ुप्लिकेट उमेदवार दिले जातात. यामुळे बऱ्याचदा मतदारांचा गोंधळ उडतो आणि नामसाधर्म्यामुळे चुकीच्या उमेदवाराला मत दिले जाते. हा गोंधळ टाळण्यासाठी ईव्हीएमवरील उमेदवार यादीवर उमेदवाचे छायाचित्र लावण्यात येणार आहे. यामुळे मत फोडण्यासाठी उभ्या राहणाऱ्या डय़ुप्लिकेट उमेदवारांना लगाम बसणार आहे.

ईव्हीएमवर उमेदवारांचे रंगीत फोटो छापले जातील. फोटोच्या तीन चतुर्थांश भागावर उमेदवाराचा चेहरा असेल. त्यावरून उमेदवार कोण आहे हे अधिक स्पष्टपणे दिसेल.

उमेदवारांचा अनुक्रमांक हा आंतरराष्ट्रीय भारतीय अंकांत असेल. त्याच्या फॉण्टचा आकार 30 असेल. हे सर्व अंक बोल्ड असतील.

ईव्हीएम मतपत्रिका अधिक स्पष्ट बनवण्यासाठी छपाई शैली बदलण्यात आली आहे. यानुसार उमेदवाराचे नाव आणि निवडणूक चिन्ह ठळकपणे छापण्यात येईल.

मतपत्रिका 70 जीएसएम कागदावर छापली जाईल, तर विधानसभा निवडणुकीसाठी आरजीबी गुलाबी रंगाच्या कागदाचा वापर केला जाईल.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

राज ठाकरे यांच्या व्यंगचित्रावर आशीष शेलार यांची टीका, जय शहा यांनी योग्य केले! राज ठाकरे यांच्या व्यंगचित्रावर आशीष शेलार यांची टीका, जय शहा यांनी योग्य केले!
पहलगाम हल्ल्याची जखम भळभळत असताना पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळण्यास हिरवा कंदील दाखवणाऱ्या मोदी सरकारला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून फटकारले....
राज्यावर वाढतोय कर्जाचा डोंगर, तरीही मंत्र्यांना महागड्या मोटारी घेण्याची मुभा, 25 लाखांवरून 30 पर्यंत खरेदी मर्यादा वाढवली
भाज्या स्वस्त… पितरं खूश; गेल्या आठवड्याच्या तुलनेत निम्म्याने दर उतरले
ठाणे महापालिकेने 13 कोटींची बिले थकवली; तिजोरीत खडखडाट.. उरले फक्त 40 कोटी
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 18 सप्टेंबर 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस
आता पीएम मित्र पार्क उभारणार 
सरकारच्या धोरणामुळे महामंडळ तोट्यात; दिवाळीत एसटी कर्मचारी आंदोलनाच्या तयारीत