आता पीएम मित्र पार्क उभारणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 75 वा वाढदिवस होता. पंच्याहत्तराव्या वाढदिवशी मोदींनी मध्य प्रदेशातील धार येथे पीएम मित्र पार्कचे भूमिपूजन केले. मध्य प्रदेशातील भाजप सरकारने मोदींचे भव्य स्वागत केले. मोदींना यावेळी धनुष्यबाण भेट देण्यात आला. मोदींनी येथे रोड शो केला व सभेलाही संबोधित केले.
मोदी अवतारी पुरुष; मुकेश अंबानींची स्तुतीसुमने
नरेंद्र मोदी हे देवाने हिंदुस्थानचे नेतृत्व करण्यासाठी पाठवलेले अवतारी पुरुष आहेत. त्यांचा वाढदिवस सणासारखा आहे, अशा शब्दांत रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांच्या इतका अथक परिश्रम करणारा माणूस मी आजवर पाहिला नाही. देशाच्या स्वातंत्र्याला 100 वर्षे होईपर्यंत त्यांनी देशाची सेवा करावी, अशी सदिच्छाही अंबांनी यांनी व्यक्त केली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List