वर्गात गैरवर्तन केले म्हणून शिक्षिकेने डोक्यात स्टीलचा डबा मारला, विद्यार्थिनीच्या डोक्याला फ्रॅक्चर

वर्गात गैरवर्तन केले म्हणून शिक्षिकेने डोक्यात स्टीलचा डबा मारला, विद्यार्थिनीच्या डोक्याला फ्रॅक्चर

वर्गात गैरवर्तन केल्याने संतापलेल्या शिक्षिकेने सहावीच्या विद्यार्थिनीच्या डोक्यात जेवणाचा स्टीलचा डबा घातला. यात विद्यार्थिनीच्या डोक्याला फ्रॅक्चर झाले आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मुलीच्या कुटुंबाने शिक्षिका आणि मुख्याध्यापक दोघांविरुद्ध पुंगनूर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील पुंगनूर येथील एका शाळेत ही घटना घडली. पीडित विद्यार्थिनीची आई देखील याच शाळेत विज्ञान शिक्षिका आहे. सहावी इयत्तेत शिकणाऱ्या सात्विका नागश्री हिने वर्गात गैरवर्तन केले म्हणून हिंदी शिकवणारी शिक्षिका संतापली. रागाच्या भरात शिक्षिकेने विद्यार्थिनीच्या डोक्यात स्टीलच्या जेवणाच्या डब्याने जोरात प्रहार केला.

मारहाणीनंतर सतत मुलीचे डोके दुखत होते आणि चक्कर येत होती. कुटुंबीयांनी मुलीला बंगळुरूतील एका खासगी रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी मुलीचे सीटी स्कॅन केले असता तिच्या डोक्यात फ्रॅक्टर झाल्याचे निष्पन्न झाले. यानंतर मुलीकडे विचारणा केली असता तिने सर्व प्रकार सांगितला. यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाणे गाठत सदर शिक्षिका आणि मुख्याध्यापकाविरोधात तक्रार दाखल केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;