चंद्रपूर मनपाच्या मलनिस्सारण संयंत्रात क्लोरीन गॅस गळती, 30 घरातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले

चंद्रपूर मनपाच्या मलनिस्सारण संयंत्रात क्लोरीन गॅस गळती, 30 घरातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले

चंद्रपूर शहरातील रहमतनगर भागात इरई नदीच्या पात्रात असलेल्या महानगरपालिकेच्या सिव्हरेज ट्रीटमेंट प्लांट मधून क्लोरीन गॅस गळतीने खळबळ उडाली आहे. प्लांटच्या जवळपास असलेल्या लोकांना डोळे आणि घशात जळजळ जाणवत आहे. यासह डोकेदुखी आणि उलटीचा त्रास होत असल्याचे दिसून आले आहे. 25 ते 30 घरातील लोकांना ताबडतोब सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.

गेल्या तीन ते चार दिवसांपासून क्लोरीन गॅस गळती सुरू असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. मात्र आज संध्याकाळी पाच वाजताच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात क्लोरीन गॅसची गळती सुरू झाल्याचे स्थानिकांचे मत आहे. त्यामुळे परिसरात एकच घबराट पसरली असून लोकांनी सुरक्षित स्थळी धाव घेतली आहे. घटनेची माहिती कळताच जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, महानगरपालिका आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून क्लोरीन गॅस ची गळती थांबवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांनी मनपा विरोधात संताप व्यक्त केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पावसाळ्यात पिठात किडे होण्यामुळे वैतागला आहात? पिठात ही गोष्ट ठेवा,  काही मिनिटांतच समस्या सुटेल पावसाळ्यात पिठात किडे होण्यामुळे वैतागला आहात? पिठात ही गोष्ट ठेवा, काही मिनिटांतच समस्या सुटेल
पावसाळ्यात शक्यतो कोणत्याही पिठात किडे होण्याची समस्या समोर येतेच. किड्यांचं प्रमाण पिठात एवढ वाढतं कि ते पीठ शेवटी फेकून देण्याव्यतिरिक्त...
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग टाकणाऱ्याला अटक
स्टेट बँक ऑफ इंडियावर दरोडा, एक कोटीची रोकड आणि 20 किलो सोने लुटून दरोडेखोर पसार
IND W Vs AUS W – गोलंदाजांची कमाल; टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 102 धावांनी पराभव केला, मालिका बरोबरीत
Asia Cup 2025 – सूर्यकुमार यादवला फाईन लावा, मॅच रेफरीवर कारवाई करा…; पाकिस्तानच्या मागण्यांना ICC ची केराची टोपली
वर्गात गैरवर्तन केले म्हणून शिक्षिकेने डोक्यात स्टीलचा डबा मारला, विद्यार्थिनीच्या डोक्याला फ्रॅक्चर
चंद्रपूर मनपाच्या मलनिस्सारण संयंत्रात क्लोरीन गॅस गळती, 30 घरातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले