रेती वाहून नेणाऱ्या ट्रकची कारला धडक, अपघातात एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू
भरधाव ट्रकने धडक दिल्याने भीषण अपघातात एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला आहे. मयत व्यक्ती नातेवाईकाला भेटण्यासाठी रुग्णालयात चालले होते. यादरम्यान ही घटना घडली. पोलीस फरार ट्रक चालकाचा शोध घेत आहेत.
आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यात बुधवारी ही घटना घडली. रेती वाहून नेणारा भरधाव ट्रक विरद्ध दिशेने येणाऱ्या कारला धडकला. कारमधील सर्वजण नेल्लोर शहरातील रहिवासी असून आत्मकुर सरकारी रुग्णालयात आजारी नातेवाईकाला भेटायला चालले होते. यादरम्यान हा अपघात घडला.
अपघातात कारमधील एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू झाला असून कारचाही चक्काचूर झाला. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. पोलिसांनी अपघाताची नोंद करत पुढील तपास सुरू केला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List