Ratnagiri News – साडवलीतील बिबट्या अखेर अडकला वनविभागाच्या जाळ्यात, मोठ्या शिताफीने घेतलं ताब्यात

Ratnagiri News – साडवलीतील बिबट्या अखेर अडकला वनविभागाच्या जाळ्यात, मोठ्या शिताफीने घेतलं ताब्यात

संगमेश्वर तालुक्यातील साडवली कासारवाडी गावात एक बिबट्या अडकल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलीस पाटलांनी तात्काळ वनविभागाला याची माहिती दिली. त्यामुळे वनविभागाच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत बिबट्याची सुखरूप सुटका केली आहे.

बुधवारी (17 सप्टेंबर 2025) सकाळी साडवली कासारवाडी गावातील रहिवासी राजेंध्र धने यांच्या घरामागे हा बिबट्या अडकला होता. साधारण सकाळी 9.30 च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. बिबट्या एकाच जागी शांत बसलेला होता, त्यामुळे त्याला पकडणं थोड सोप्प झालं. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी मोठ्या शिताफीने त्याला ताब्यात घेतले. नंतर वन्यजीव पशुवैद्यक युवराज शेटे आणि संतोष वाळवेकर यांनी बिबट्याची वैद्यकीय तपासणी केली. हा बिबट्या नर जातीचा असून त्याचे वय साधारण 3 ते 4 वर्षे आहे. त्याच्या डाव्या पायाच्या मागील मांडीला जखम झाल्याचे दिसून आले, ज्यामुळे त्याला चालता येत नव्हते. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याच्यावर त्वरित उपचार केले. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी वनविभागाचे अनेक वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

यामध्ये सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती प्रियंका लगड, परिक्षेत्र वन अधिकारी प्रकाश सुतार आणि जितेंद्र गुजले, वनपाल सागर गोसावी, सारिक फकीर, तसेच वनरक्षक आकाश कडूकर, सहयोग कराडे, सुप्रिया काळे, सूरज तेली, नमिता कांबळे, श्रावणी पवार, विशाल पाटील, दत्तात्रय सुर्वे आणि रणजीत पाटील यांचा समावेश होता. साडवलीचे पोलीस पाटील आणि गावातील इतर ग्रामस्थही यावेळी मदतीला उपस्थित होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

स्टेट बँक ऑफ इंडियावर दरोडा, एक कोटीची रोकड आणि 20 किलो सोने लुटून दरोडेखोर पसार स्टेट बँक ऑफ इंडियावर दरोडा, एक कोटीची रोकड आणि 20 किलो सोने लुटून दरोडेखोर पसार
स्टेट बँक ऑफ इंडियावर दरोडा पडल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. तीन अज्ञात व्यक्तींनी बँकेत घुसून एक कोटींची रोकड आणि...
IND W Vs AUS W – गोलंदाजांची कमाल; टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 102 धावांनी पराभव केला, मालिका बरोबरीत
Asia Cup 2025 – सूर्यकुमार यादवला फाईन लावा, मॅच रेफरीवर कारवाई करा…; पाकिस्तानच्या मागण्यांना ICC ची केराची टोपली
वर्गात गैरवर्तन केले म्हणून शिक्षिकेने डोक्यात स्टीलचा डबा मारला, विद्यार्थिनीच्या डोक्याला फ्रॅक्चर
चंद्रपूर मनपाच्या मलनिस्सारण संयंत्रात क्लोरीन गॅस गळती, 30 घरातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले
माँसाहेबांच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्या व्यक्तीला कठोरात कठोर शिक्षा करा, सुप्रिया सुळे यांची मागणी
Ratnagiri News – हातखंबा येथे भरधाव ट्रकने अनेक गाड्यांना उडवले; एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू