वलसाड फास्ट पॅसेंजरचे इंजिन पेटले; परेची गुजरातकडे जाणारी रेल्वे सेवा विस्कळीत
मुंबई सेंट्रल येथून गुजरातकडे जाणाऱया वलसाड फास्ट पॅसेंजरच्या इंजिनला आज रात्री आठच्या सुमारास अचानक आग लागली. हा प्रकार केळवे रेल्वे स्थानकाच्या जवळ घडला. प्रसंगावधान राखून मोटरमनने गाडी केळवे स्थानकात थांबवली आणि सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेमुळे पश्चिम रेल्वेची गुजरातकडे जाणारी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली.
वलसाड फास्ट पॅसेंजर आज रात्री आठच्या सुमारास केळके स्थानकाच्या जवळ आल्यानंतर इंजिनला आचानक आग लागली. इंजिनमधून अचानक धूर निघू लागल्याने मोटरमनने तातडीने गाडी केळवे स्थानकात थांबवली. त्यानंतर काही क्षणातच आगीचा भडका उडाला. सर्व इंजिन आगीच्या विळख्यात सापडले. रेल्वे प्रशासनाने सर्क प्रकाशांना सुरक्षितरीत्या प्लॅटफॉर्मकर उतरवले आणि आग लागलेले इंजिन डब्यांपासून केगळे केले. यानंतर पालघर नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होऊन इंजिनला लागलेली आग आटोक्यात आणली. या घटनेमुळे अडकून पडलेल्या प्रवाशांसाठी जिल्हा प्रशासनाने एसटी बसेसची व्यवस्था केली.
ओव्हरहेडचा वीजपुरवठा बंद केला
मुंबई सेंट्रल – वलसाड फास्ट पॅसेंजर (59023) च्या इलेक्ट्रिक लोकोमध्ये आग लागल्याची घटना घडली. सर्व प्रवासी व कर्मचारी सुरक्षित असून कोणालाही इजा झालेली नाही. सुरक्षिततेसाठी काही काळासाठी ओव्हरहेड वीजपुरकठा बंद करण्यात आला. त्यामुळे सुरतकडे जाणाऱ्या डाऊन ट्रेनची वाहतूक विस्कळीत झाली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List