मसूद अझहरनेच संसदेवर हल्ला घडवून आणला, जैशच्या कमांडरच्या कबुलीने शहाबाज शरीफची झोप उडणार

मसूद अझहरनेच संसदेवर हल्ला घडवून आणला, जैशच्या कमांडरच्या कबुलीने शहाबाज शरीफची झोप उडणार

जैश-ए-मोहम्मदचा कमांडर मसूद इलियास कश्मीरीने दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या पाकिस्तानची पोलखोल केली आहे. मसूद अझहरच दिल्ली आणि मुंबईतील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड असल्याची कबुली कश्मीरीने दिली. कश्मीरीने एक व्हिडिओ जारी करत मसूद अझहरनेच संसद हल्ला आणि 26/11 चा दहशतवादी हल्ला घडवून आणल्याचं म्हटलं आहे.

दहशतवाद्यांना आश्रय दिल्याचे पाकिस्तान नाकारत असते. मात्र कश्मीरीच्या कबुलीमुळे पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड झाला आहे. बालाकोट आणि बहावलपूर येथे जैश-ए-मोहम्मदची दहशतवादी तळं असल्याचेही इलियास कश्मीरीने सांगितले. तसेच अझहर बालाकोटमधील तळावर लपला होता, जेथे 2019 मध्ये हिंदुस्थानने हल्ला केला होता. मौलाना मसूद अझहर दिल्लीतील तिहार तुरुंगातून पाकिस्तानात येतो, असेही कश्मीरी व्हिडिओत म्हणाला.

इलियास कश्मीरी पुढे म्हणाला की, 7 मे रोजी हिंदुस्थानी हवाई दलाने जैशच्या बहावलपूर येथील मुख्यालय जामिया मस्जिद सुभान अल्लाहवर हवाई हल्ला केला, ज्यामध्ये मसूद अझहरच्या कुटुंबातील अनेक सदस्यांचा मृत्यू झाला. बहावलपूरमध्ये मारल्या गेलेल्या जैश दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारात सहभागी होण्याचे आदेश पाकिस्तानच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना देण्यात आले होते, असा खुलासाही कश्मीरीने केला. दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारात अनेक पाकिस्तानी लष्करी अधिकारी उपस्थित असल्याचे दिसून आले. त्यावेळी हिंदुस्थानने दहशतवाद्यांना राज्य सन्मान दिल्याबद्दल पाकिस्तानला फटकारले होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

तुम्ही प्रेग्नंट असाल तर या 5 गोष्टी कधीही करू नका; हानी पोहोचवू शकते तुम्ही प्रेग्नंट असाल तर या 5 गोष्टी कधीही करू नका; हानी पोहोचवू शकते
महिलांना त्यांच्या प्रेग्नसीच्या काळात अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. आराम, आहार हे तर गरजेच असतच पण सोबतच काही गोष्टी टाळायच्याही...
पंतप्रधान मोदींच्या फिटनेसचे रहस्य ही खास भाजी; जी प्रत्येकाच्या घरात बनते, म्हणून वयाच्या 75 व्या वर्षीही इतके तंदुरुस्त
रेती वाहून नेणाऱ्या ट्रकची कारला धडक, अपघातात एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू
केरळमध्ये हाय अलर्ट, ‘मेंदू खाणाऱ्या अमिबा’ने घेतला 19 जणांचा जीव
जम्मू-कश्मीर आपलंच असेल! पहलगाम हल्ल्याच्या कटातील सूत्रधाराची हिंदुस्थानला धमकी
Asia Cup 2025 – UAE सोबत खेळण्यास नकार, पाकिस्तान आशिया चषकातून बाहेर!
Ratnagiri News – साडवलीतील बिबट्या अखेर अडकला वनविभागाच्या जाळ्यात, मोठ्या शिताफीने घेतलं ताब्यात