पंतप्रधान मोदींच्या फिटनेसचे रहस्य ही खास भाजी; जी प्रत्येकाच्या घरात बनते, म्हणून वयाच्या 75 व्या वर्षीही इतके तंदुरुस्त
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज त्यांचा 75 वा वाढदिवस असून ते या वयात देखील तेवढेट फिट आहेत. कारण तरुणांना लाजवेल अशी त्यांची एनर्जी आहे. पंतप्रधान मोदींची ऊर्जा, शिस्तबद्ध दिनचर्या आणि निरोगी खाण्याच्या सवयी सर्वांनाच आश्चर्यचकित करतात. सलग तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान बनलेले नरेंद्र मोदी या वयातही इतके उत्साही आणि फिट कसे राहतात याचा प्रश्न सर्वांनाच पडतो. पण पंतप्रधान मोदींच्या तंदुरुस्ती आणि उर्जेमागील रहस्य त्यांची शिस्तप्रिय दिनचर्या तर आहेच पण सोबतच एक भाजी आहे जे नेहमी आहारात समाविष्ट करतात त्यामुळे ते नेहमीच तंदुरुस्त राहतात.
चला जाणून घेऊयात भारताचे पंतप्रधान वयाच्या 75 व्या वर्षीही आहेत इतके फिट अन् उत्साही राहण्यासाठी नक्की काय करतात?
सकाळी लवकर उठणे
पंतप्रधान मोदींच्या दैनंदिन दिनचर्येत लवकर झोपणे आणि लवकर उठणे ही सवय समाविष्ट आहे. ते पहाटे 4 वाजता अंथरुणातून उठतात. ते त्यांच्या सकाळची सुरुवात योगासने, सूर्यनमस्कार, ध्यान, चालणे आणि हलका व्यायाम करून करतात. यामुळे त्यांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य दोन्ही राखण्यास मदत होते.
सात्विक संतुलित आहार
नरेंद्र मोदींचा आहार अत्यंत साधा आणि सात्विक असतो. आजच्या तरुणांना आवडणारे जंक आणि तेलकट पदार्थ ते अजिबात खात नाही. मुख्य म्हणजे ते कमी मीठ आणि साखरेचा आहार घेतात. अनेक मुलाखतींमध्ये, पंतप्रधान मोदींनी स्वतः हे सांगितले आहे की त्यांच्या आहारात हंगामी फळे आणि हलके जेवण असते. जसे की, खिचडी, मसूर, भाज्या, अंकुरलेले धान्य, दही आणि ताक यासारखे पारंपारिक भारतीय पदार्थ त्यांच्या आहाराचा भाग असतो. त्यातल्या त्यात मोदींना विशेषतः मोरिंगा ज्याला शेवग्याच्या शेंगांची भाजीही म्हणतात. ती त्यांना खाणे फार आवडते. ते अनेकदा त्यांच्या जेवणात या भाजीचा समावेश करत असतात. जेणेकरून त्यांना भरपूर ऊर्जा मिळेल.
कोमट पाणी
हिवाळा असो किंवा उन्हाळा, पंतप्रधान मोदी वर्षभर नेहमीच कोमट पाणी पितात. कोमट पाणी पिल्याने पचनक्रिया व्यवस्थित राहण्यास मदत होते. त्यामुळे ते नेहमी कोमट पाणी पितात
शिस्तबद्ध दिनचर्या
पंतप्रधान मोदी कितीही व्यस्त असले तरी ते त्यांच्या दिनचर्येत कधीही तडजोड करत नाहीत. वेळेवर झोपणे आणि उठणे हे त्यांच्या तंदुरुस्तीचे एक महत्त्वाचे रहस्य आहे. ते घरी असोत किंवा परदेशात, पंतप्रधान नेहमीच संतुलित आणि शिस्तबद्ध दिनचर्या पाळतात. आणि समजा कामामुळे त्यांना झोपण्यास उशीर झाला तरी ते सकाळी लवकरच उठतात आणि त्यांची दिनचर्या पाळतात.
उपवास करतात
पंतप्रधान मोदी त्यांच्या इंद्रियांना जागृत करण्यासाठी उपवास करतात. त्यांनी एका मुलाखतीत हे सांगितले होते की जेव्हा तुम्ही उपवास करता तेव्हा तुमची सर्व इंद्रिये जास्त सक्रिय होतात. त्यामुळे तुम्हाला मग नंतर तुम्हाला पाण्याचा वास देखील येऊ शकतो आणि चहा पिऊन कोणी व्यक्ती तुमच्या शेजारून गेला तरी ते तुम्हाला जाणवते.
उपवास तुमच्या सर्व इंद्रियांना सक्रिय करतो, त्यांची क्षमता अनेक पटींनी वाढवतो. पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले की ते उपवास सुरू करण्यापूर्वी भरपूर पाणी पितात, ज्यामुळे शरीराला विषमुक्त करते आणि उपवासासाठी पूर्णपणे तयार करते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List