ना जेवण-पाणी, ना प्रसाधनाची सोय; जॉर्जियात 56 हिंदुस्थानी नागरिकांना जनावरांसारखी वागणूक
विदेशात हिंदुस्थानी वंशाच्या नागरिकांसोबत गैरवर्तन, मारहाण, खून यासारख्या घटना आता नित्याच्याच झाल्या आहेत. मध्यंतरी बेकायदेशीरपणे अमेरिकेत राहणाऱ्या हिंदुस्थानी नागरिकांना हातकड्या घालून हिंदुस्थानात आणण्यात आले होते. आता जॉर्जियाच्या सीमेवरही असाच प्रकार घडला असून पात्र व्हिसा आणि आवश्यक कागदपत्र असतानाही 56 हिंदुस्थानी नागरिकांना जनावरांसारखी वागणूक देण्यात आल्याचे समोर आले आहे. एका महिलेने इन्स्टा पोस्टमधून हा प्रकार समोर आणल्यानंतर खळबळ उडाली आहे.
ध्रुवी पटेल हिने सोशल मीडियावर जॉर्जियातील भयंकर अनुभवाची पोस्ट शेअर केली आहे. जॉर्जियामध्ये 56 हिंदुस्थानी नागरिकांचा अमानुष छळ करण्यात आला. पात्र व्हिसा, आवश्यकत कागदपत्र असतानाही भयंकर थंडीमध्ये 5 तासांहून अधिक काळ कुडकुडत बसावे लागले. या काळात जेवण-पाणीही मिळाले नाही आणि तिथे शौचालयाचीही व्यवस्था नव्हती. पासपोर्ट घेऊन गेलेले अधिकारी दोन तास फिरकलेही नाहीत. आम्हाला जनावरांना गोठ्यात बसवतात तसे रस्त्यावर बसवण्यात आले होते, असे ध्रुवी पटेल हिने म्हटले.
आम्हाला सगळ्यांना गुन्हेगारांप्रमाणे वागणूक देण्यात आली. यावेळी काही अधिकारी आमचे व्हिडीओही काढत होते. पण आम्ही त्यास विरोध केला. यानंतर तुमचा व्हिसा चुकीचा असल्याचे त्यांनी म्हटले. आम्हाला अत्यंत घृणास्पद वागणूक देण्यात आली, असे म्हणत ध्रुवीने पंतप्रधान मोदी आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली.
दरम्यान, हा धक्कादायक प्रकार जॉर्जियाच्या सीमेवरील साडाख्लो येथे घडल्याचा दावा ध्रुवी पटेल हिने केला आहे. अमेरिका आणि जॉर्जियातील क्रॉसिंगचा हा भाग असल्याचेही तिने म्हटले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List