21 दिवस गव्हाची चपाती न खाल्ल्यास शरीरात काय होतात बदल? जाणून हैराण व्हाल
भारतातील जवळजवळ प्रत्येक घरात गव्हाची चपाती बनवली जाते. लोक वर्षानुवर्षे गव्हाची चपाती किंवा रोटी खात आहेत . मैदा खाण्यापेक्षा गव्हाची चपाती कधीही चांगली अशी धारणा आहे. त्यामुळे घरात चपातीही असतेच असते. पण तुम्हाला माहिती आहे का की ते आपल्या शरीरासाठी गव्हाची चपाती कितपत फायदेशीर असते? आपण कधी याचा विचार केला का?
21 दिवस गव्हाची चपाती खाणे सोडून दिले तर…
गहू पौष्टिक गुणधर्मांनी परिपूर्ण असतो परंतु हे देखील खरे आहे की ते खाल्ल्याने शरीरातील रक्तातील साखरेची पातळी वाढते. गव्हाची चपाती लवकर पचत नाही, ज्यामुळे ती पचनक्रिया बिघडू शकते. जर कोणी 21 दिवस गव्हाची चपाती खाणे सोडून दिले तर शरीरात काय बदल होतील? तज्ज्ञांनी काय म्हटलं आहे जाणून घेऊयात.
गव्हाची चपाती का खाऊ नये?
तज्ज्ञांच्या मते आपल्याला आपल्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करायचे असेल तर सर्वप्रथम आपला आहार बदलावा लागेल. आहारात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे धान्य. यामध्ये सर्वात हानिकारक धान्य म्हणजे गहू. जर आपण फक्त 21 दिवस जरी गहू म्हणजे चपाती, रोटी खाणं सोडलं तर नक्कीच संपूर्ण शरीरात बदल दिसून येतील.
गव्हाचे तोटे काय असतात?
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की गहू खाल्ल्याने लोकांना जळजळ होते. जळजळ म्हणजे शरीरात सूज येणे. अनेक लोकांना हे देखील माहित नसते की त्यांना गव्हाची ऍलर्जी आहे, त्यामुळे त्यांना नंतर अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. गव्हामध्ये ग्लूटेन असते. अशा परिस्थितीत, या लोकांना पोटात, चेहऱ्यावर आणि नंतर हातपायांवर सूज येते. अनेकांना तर गॅसची समस्याही जाणवू लागते कारण गहू पचायला जड असतो. त्यामुळे काहींना दिवसभर थकवाही जाणवू शकतो.
गव्हाच्या चपाती किंवा रोटीऐवजी काय खावं?
गव्हाऐवजी तुम्ही भरड धान्याच्या पोळ्या खाऊ शकता. तुम्ही नाचणी किंवा बाजरी खाऊ शकता. हे खाल्ल्याने तुम्हाला दिसेल की तुमचा फिटनेस खूप सुधारला आहे. यासोबतच, शरीराला भरड धान्यापासून अनेक प्रकारचे पोषक घटक मिळतात. शिवाय चपातीप्रमाणे पोट जड होत नाही. पोट हलक भासतं. उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात बाजरीच्या भाकरी खाणे चांगले असते. तसेच नाचणीमध्ये देखील बरीच जीवनसत्त्वे असतात.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List