तरूणीच्या शरीरातून उंदीर मेल्यासारखा वास, या प्रकारातून सर्वच हादरले, काय घडलं नेमकं?
प्रत्येकाला आपल्या शारीराची योग्य काळजी घेता आलीच पाहिजे. कारण थोडाही बेजबाबदारपणा जीवावर बेतू शकतो… एका तरुणीसोबत देखील असं झालं आहे. तिचा बेजबाबदारपणा तिच्या जीवावर बेतू शकला असता. अमेरिकेत राहण्याऱ्या तरुणीने सांगितलं, अचानक तिची प्रकृती खालावली आणि तिच्या शरीरातून उंदीर मेल्यासारखा वास येऊ लागला… जेव्हा तपासणी करण्यात आली तेव्हा कारण जाणून डॉक्टर देखील हैराण झाले. तुरुणीच्या प्रायव्हेट भागात 1 महिन्यापर्यंत टॅम्पोन अडकलेला होता.
रिऍलिटी शो ‘द सर्कल 7’ ची स्पर्धक सवाना मिलर हिने तिच्यासोबत घडलेल्या धक्कादायक घटनेबद्दल सांगितलं आणि अन्य महिलांना देखील सतर्क केलं. सवाना मासिक पाळी दरम्यान टॅम्पोनचा वापर करते. सॅनिटरी पॅडप्रमाणेत टॅम्पोन देखील रक्त प्रवाह शोषण्याचं काम करतं.
ही घटना घडली तेव्हा सवाना मिलर 22 वर्षांची कॉलेजची विद्यार्थिनी होती. मासिक पाळीच्या शेवटच्या दिवसांत ती मैत्रिणींसोबत बारमध्ये गेली आणि रक्त प्रवाह टाळण्यासाठी टॅम्पोनचा वापर केला. दुसऱ्या दिवशी जेव्हा रक्त प्रवाह बंद झाला तेव्हा टॅम्पोनचा अर्धा भाग तिच्या शरीरातच राहिला… काही दिवसांनंतर तिला विचीत्र लक्षणं जाणवू लगली. ती सतत आजारी पडू लागली. खास, घाणेरडा वास… तरुणी म्हणाली, ‘असं वाटायचं की शरीरात उंदीर मेला आहे आणि त्याचा वास येतोय…’
येणाऱ्या वासामुळे वर्गात देखील तरुणीला चांगलं वाटत नव्हतं. सवाना अनेकदा क्लिनिकमध्ये देखील देली. पण सुरुवातीला काहीही कळलं नाही. एसटीडी चाचण्या सामान्य झाल्या. डॉक्टरांनी ते बॅक्टेरियल योनिओसिस (बीव्ही) असल्याचे निदान केले, परंतु सवानाला समजलं की ते तसं नव्हतं.
यादरम्यान देखील ती नव्या टॅम्पोनचा वापर करत होती. अखेर तिसऱ्या तपासणीत, तिच्या लघवीच्या नमुन्यात कापसाचे कण आढळले. मग डॉक्टरांना संशय आला की आत टॅम्पोन अडकला असावा? जेव्हा तपासणी सखोल केली गेली तेव्हा असं आढळून आलं की ते खरोखर गर्भाशय ग्रीवाजवळ अडकलं होतं. डॉक्टरांना ते काढावं लागलं…
सांगायचं झालं तर, हा एक धोकादायक जिवाणू संसर्ग आहे ज्यामध्ये जीवाणूंद्वारे सोडलेले विषारी पदार्थ रक्तप्रवाहात पसरतात. यामुळे अवयव निकामी होणे, कोमा आणि मृत्यू देखील होऊ शकतो. तेव्हापासून टॅम्पोन पॅकेजिंगवर चेतावनी देण्यात येते की, प्रत्येक 8 तासांत टॅम्पोन बदली केला पाहिजे…
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List