तुम्हीही खाता शिळी चपाती? फायदे आणि तोटे जाणून घ्या
भारतीय घरांमध्ये लोक सकाळच्या नाश्त्यात किंवा संध्याकाळच्या चहासोबत शिळी चपाती आवर्जून खातात. ग्रामीण भागात शिळी चपाती अगदी आवडीने खाल्ली जाते. काही लोकांचा असा विश्वास आहे की शिळी चपाती खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात. त्याच वेळी, काही लोक म्हणतात की शिळी चपाती प्रत्येकासाठी फायदेशीर नसते.नक्की यामागील सत्य काय आहे जाणून घेऊयात.
आरोग्य तज्ञांचा असा विश्वास आहे की शिळ्या चपातीच्या फायद्यांसोबतच त्याचे काही तोटे देखील आहेत. जसे की ती योग्य पद्धतीने न खाणे, किंवा बरेच दिवस शिळी चपाती खात राहणे किंवा चुकीच्या वेळी खाणे. म्हणून जर तुम्हीही शिळी चपाती खात असाल तर हा लेख तुमच्यासाठी आहे. येथे आम्ही तुम्हाला शिळ्या चपातीचे फायदे आणि तोटे काय आहेत ते सांगणार आहोत.
आहारतज्ज्ञ काय म्हणतात?
आहारतज्ज्ञ शिखा गुप्ता म्हणतात की, आयुर्वेद असो किंवा वैद्यकीय शास्त्र, दोन्हीही म्हणतात की अन्न नेहमीच ताजे खावे. जेव्हा तुम्ही अन्न शिजवून बाहेर ठेवता किंवा काही काळासाठी ठेवता तेव्हा ते शिळे होऊ लागते. अशा परिस्थितीत हवेत असलेले बॅक्टेरिया, बुरशी अन्नाला दूषित करतात. चपातीच्या बाबतीतही असेच आहे. हवेत असलेले हे बॅक्टेरिया हळूहळू चपातीच्या आत जातात आणि जेव्हा तुम्ही शिळी चपाती खाता तेव्हा त्याचे फायदे कमी आणि नुकसान जास्त होते. हो, पण 1 ते 2 दिवस शीळी चपाती खाल्ल्याने तुम्ही आजारी पडणार नाही. पण जर तुम्ही दररोज शिळी चपाती खात असाल तर मात्र याचा आरोग्यावर नक्कीच परिणाम करेल.
शिळी चपाती खाण्याचे फायदे
आयुर्वेदात, शिळी चपाती खाण्याचे फायदेही सांगितले गेले आहेत. असे म्हटले जाते की शिळी चपाती खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रित राहते. त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. पोटाच्या समस्या असलेल्या लोकांसाठीही शिळी चपाती खाणे फायदेशीर आहे. त्यामुळे पोटात जळजळ, आम्लपित्त आणि आंबटपणा यापासून आराम मिळतो. शिळी रोटीमध्ये भरपूर फायबर असते, त्यामुळे वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठीही ती फायदेशीर आहे.
शिळी चपाती खाण्याचे तोटे
आहारतज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे, शिळ्या चपातीमध्ये बुरशीजन्य आणि बॅक्टेरिया वाढण्याचा धोका जास्त असतो. अशा परिस्थितीत त्याचा आरोग्यावरही वाईट परिणाम होतो. शिळी चपाती खाल्ल्याने अन्नातून विषबाधा होण्याचा धोका असतो. याशिवाय पोटदुखी, उलट्या आणि पचनाशी संबंधित समस्या देखील उद्भवतात.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List