चांदीने गाठला उच्चांक सोनेही चमकले
सणासुदीचे दिवस आहेत. अशातच सोन्याचांदीचे दर वाढले आहेत. चांदीने बुधवारी आपला सार्वकालीन उच्चांक गाठला. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, आज चांदीचा भाव 392 रुपयांनी वाढून 1,16,525 रुपये प्रति किलो झाला आहे. काल त्याची किंमत 1,16,133 रुपये होती. 24 कॅरेट सोन्याचा भाव 339 रुपयांनी वाढून 1,00,827 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. मंगळवारी सोने 1,00,488 रुपये होते. 8 ऑगस्ट रोजी सोन्याने 1,01,406 रुपयांचा उच्चांक गाठला होता.
मुंबईत 24 कॅरेट सोन्याची किंमत 1,02,060 रुपये आहे, तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 93,550 रुपये आहे. या वर्षी, सोने सुमारे 25087 रुपये आणि चांदी 30508 रुपये महागली आहे. 31 डिसेंबर 2024 रोजी सोने 76045 प्रति तोळा दर होता. तर चांदी 85680 रुपये किलो होती. यावर्षी सोने 1,00,827 रुपयांवर पोहोचले. चांदी 1,16,525 रुपयांवर पोहोचली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List