वजन कमी करण्यासोबतच त्वचेलाही ग्लो आणेल हा गरम मसाला, वाचा या मसाल्याचे आरोग्यवर्धक फायदे
सध्याच्या घडीला आपल्या आहारातील बदलामुळे आपले वजनही खूप वाढू लागले आहे. फास्ट फूडच्या माध्यमातून आपल्या शरीरामध्ये साखर मोठ्या प्रमाणात जाते. हीच साखर आपल्या आरोग्यासाठी एक गंभीर संकट बनत आहे. शरीरामध्ये साखर वाढू लागली की, इतर आजारांना सुरुवात होते. परंतु निसर्गाने नेहमी आपल्याला नैसर्गिक उपचाराचा मार्ग दाखवला आहे. असाच एक नैसर्गिक उपाय म्हणजे दालचिनी. दालचिनीचे पाणी आपल्या त्वचेला चमक देण्यास मदत करते. तसेच चेहऱ्यावरील चरबीही कमी होते. यामुळे पचनसंस्था सुधारण्यास मदत होते. दालचिनीमुळे रक्तातील ग्लुकोज, कोलेस्टेरॉल आणि रक्तदाब कमी करण्यास प्रभावी आहे.
शाकाहारींसाठी प्रथिनांचा खजिना आहे ‘ही’ डाळ, वाचा याचे आरोग्यवर्धक फायदे
दालचिनीमध्ये सिनामल्डिहाइड आणि पॉलीफेनॉलसारखे अनेक विशेष घटक असतात. यामुळे जळजळ कमी होते. तसेच चयापचय सुधारण्यास मदत होते. यामुळे दालचिनी ही शुगर असलेल्या रुग्णांसाठी फार महत्त्वाची मानली जाते.
दालचिनीचे सेवन केल्याने साखरेची अचानक वाढ टळते. तसेच आपले रक्त शुद्ध होण्यास दालचिनीमुळे मदत मिळते. दालचिनी आपल्या पित्त आणि कफ दोषांना संतुलित करते.
रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित करण्यासाठी दालचिनीचे पाणी
दालचिनीची काडी, १/४ चमचा मेथीचे दाणे, ३-४ तुळशीची पाने आणि १.५ कप पाणी आवश्यक आहे. त्यांना १०-१२ मिनिटे उकळवा, थंड करा आणि सकाळी रिकाम्या पोटी प्या. यामुळे तुमचा स्वादुपिंड मजबूत होईल आणि रक्तातील साखर नियंत्रित राहील आणि तुम्हाला दिवसभर भूक कमी लागेल.
वजन कमी करण्यासाठी दालचिनीचे पाणी
एक दालचिनीची काडी, अर्धा चमचा सुंठ, पचन सुधारण्यासाठी थोडे मीठ, चिमूटभर काळी मिरी आणि काही थेंब लिंबू घाला. मसाले २ कप पाण्यात अर्धे शिल्लक राहेपर्यंत उकळा. थंड करा आणि लिंबू घाला. दुपारी किंवा संध्याकाळी हळूहळू प्या.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List