साहित्य संघाच्या निवडणुकीत मतचोरीचा आरोप,  ‘ऊर्जा’ आणि ‘डॉ. भालेराव विचार मंच’ पॅनेल आमनेसामने

साहित्य संघाच्या निवडणुकीत मतचोरीचा आरोप,  ‘ऊर्जा’ आणि ‘डॉ. भालेराव विचार मंच’ पॅनेल आमनेसामने

तब्बल दोन दशकांनी होणाऱ्या गिरगाव येथील मुंबई मराठी साहित्य संघाच्या निवडणुकीची रंगत वाढली आहे. निवडणुकीत ऊर्जा पॅनेल आणि डॉ. भालेराव विचार मंच  असे दोन गट परस्परविरोधी उभे आहेत. निवडणुकीत मतचोरीचा आरोप होत आहे. दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोप सुरू आहेत.

साहित्य संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत मनमानी सुरू असल्याचा आरोप  डॉ.भालेराव विचार मंचने आज पत्रकार परिषद घेऊन केला.  संघातील कर्मचारी आणि निवडणूक अधिकारी यांच्याशी संगनमत करून 600 सदस्यांच्या मत पत्रिका चोरून लपवून ठेवल्या आहेत. तसेच मतदारांना आता ‘डुप्लिकेट’ मतपत्रिका दिल्या जात असल्याचा गंभीर आरोप डॉ. भालेराव विचार मंच पॅनलच्या उमेदवारांनी डॉ. उषा तांबे यांच्या ‘ऊर्जा’ पॅनलवर केला आहे. निवडणुकीचा कंत्राटदार आणि निवडणूक अधिकारी यांची फौजदारी चौकशी व्हावी, अशी मागणी  भालेराव पॅनलने केली आहे. पत्रकार परिषदेला डॉ.भालेराव विचार मंच पॅनलचे उमेदवार प्रा.नरेंद्र पाठक, प्रमोद पवार, दिवाकर दळवी, अनिल गजके, सारंग दर्शने उपस्थित होते.

मतदार यादी अद्ययावत केलेल्या नाहीत. त्यामुळे 345 पत्रे परत आली. मतदारांकडे चौकशी केली असता त्यांना अद्याप मतपत्रिका मिळालेल्या नाहीत. 600 मतपत्रिका लपवून ठेवण्यात आल्या आहेत. योग्य वेळी ही मतपेटीत टाकायची कारस्थान रचण्यात आले आहे. मतपत्रिकेचे कंत्राट ज्या खासगी एजन्सीला देण्यात आले त्या एजन्सीने प्रत्यक्षात मतपत्रिका न पाठविता केवळ बुकिंग रिसिट साहित्य संघात जमा केले. हा  फौजदारी स्वरूपाचा आर्थिक घोटाळा असून त्याची चौकशी करण्यात यावी.

z प्रमोद पवार, उमेदवार (डॉ.भालेराव विचार मंच)

या आरोपांमध्ये काहीच तथ्य नाही. मतदानाची प्रक्रिया अद्याप सुरू आहे. त्याची मुदत वाढवून 17 सप्टेंबर करण्यात आली आहे. निवडणूक  पारदर्शक, निष्पक्षपणे होईल. ज्यांना मतपत्रिका मिळाली नाही, त्यांना आम्ही देतोय.  ज्यांच्या मतपत्रिका परत आल्या आहेत, त्यांनाही घेऊन जाण्यास सांगितले आहे. कोणतीही मतचोरी झालेली नाही.

z ऍड यशोधन दिवेकर, निवडणूक अधिकारी

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आयुष कोमकर हत्या प्रकरण, कुख्यात बंडू आंदेकरसह 8 जणांना अटक आयुष कोमकर हत्या प्रकरण, कुख्यात बंडू आंदेकरसह 8 जणांना अटक
गृहकलहातून तरुणावर पिस्तुलातून  गोळ्यांचा वर्षाव करीत खून करणाऱ्या आंदेकर टोळीच्या पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत. संबंधित आंदेकर कुटुंबीय...
‘हे’ पाणी महिलांसाठी वरदानापेक्षा कमी नाही! दररोज या पाण्याच्या सेवनाने चेहऱ्यावर येईल अनोखी चमक
चंद्रपूर जिल्हा परिषदेचे बांधकाम अभियंता निलंबित, लाच घेतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सीईओंकडून कारवाई
15 सप्टेंबरपासून दुप्पट पैसे मोजावे लागणार, हेलिकॉप्टरने चारधाम यात्रा करणे महागणार
‘ऑपरेशन सिंदूर’वेळी 400 वैज्ञानिकांनी 24 तास काम केले, ‘इस्रो’चे प्रमुख व्ही. नारायणन यांची माहिती
चंद्रपूरात बीएसएनएल कॉपर केबल चोरीचा 24 तासांत उलगडा; दोन आरोपींना अटक, 44 लाखांचा मुद्देमाल जप्त
यूपीआयचे नियम सोमवारपासून बदलणार, व्यापारी पेमेंटची मर्यादा वाढणार