प्रज्ञा सिंह यांच्यासह सात जणांच्या सुटकेला आव्हान
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात भाजपच्या माजी खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यासह कर्नल प्रसाद पुरोहित व अन्य पाच आरोपींची विशेष सत्र न्यायालयाने ठोस पुराव्यांअभावी सुटका केली. मात्र या निर्णयाला हल्ल्यातील पीडितांनी आक्षेप घेत हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. दोषपूर्ण तपास किंवा तपासातील काही त्रुटी आरोपींना निर्दोष सोडण्याचे कारण असू शकत नाहीत, असा दावा अपीलात करण्यात आला असून आरोपींच्या सुटकेचा निर्णय रद्द करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List