शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शेतकरी संघर्ष समिती 28 ऑक्टोबरला मुंबईत आंदोलन करणार – कैलास पाटील

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शेतकरी संघर्ष समिती 28 ऑक्टोबरला मुंबईत आंदोलन करणार – कैलास पाटील

छत्रपती संभाजीनगर येथे पार पडलेल्या शेतकरी संघटनांच्या बैठकीत शेतकरी व शेतमजूरांच्या हितासाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी संघर्ष समिती स्थापन करण्यात आली. या बैठकीला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार कैलास पाटील उपस्थित राहिले होते. यावेळी कैलास पाटील यांनी शेतकरी संघर्ष समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी व हक्कांसाठी व्यापक लढा उभारणार असल्याचा निर्धार केला. कैलास पाटील यांनी ट्विटरवरून याबाबत माहिती दिली.

”या बैठकीस उपस्थित राहून आपापल्या राजकीय भूमिका व मतभेद बाजूला ठेवून केवळ शेतकरी हितासाठी सर्व शेतकरी संघटनांनी एकत्रित येऊन संघर्ष समितीची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत कर्जमाफी, शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित दीडपट हमीभाव, बोगस बी बियाणे यासह अनेक महत्वाच्या मुद्यांवर चर्चा करण्यात आली. राज्य सरकारने निवडणुकीपूर्वी कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. मात्र निवडणुकीनंतर कर्जमाफीसाठी चालढकल करत असून आता शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे.. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी मेटाकुटीस आला असून आत्महत्यासारखे पाऊल उचलत आहे. त्यामुळे या विश्वासघातकी सरकारला वठणीवर आणण्यासाठी राज्यव्यापी लढा देण्याचा निर्णय घेण्यात आला”, असे कैलास पाटील यांनी ट्विट केले आहे.

शेतकरी व शेतमजूरांच्या हक्कासाठी झालेल्या बैठकीत शेतकरी संघर्ष समितीची स्थापना झाली. या समितीतर्फे महायुती सरकारने जी आश्वासने दिली होती त्याच्या पूर्ततेसाठी वेगवेगळ्या शहरांमध्ये मेळावे घेण्यात येणार असून 28 ऑक्टोबरला मुंबईत मोठं आंदोलन करण्याचं ठरलं आहे. एकत्रित लढा देऊन सरकारवर दबाव टाकायचा असं ठरलं आहे, असे कैलास पाटील यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

125 किलोवरून थेट 55 किलो! महिलेने वजन कमी कसे केले? रामदेव बाबांनी सिक्रेट सांगितले! 125 किलोवरून थेट 55 किलो! महिलेने वजन कमी कसे केले? रामदेव बाबांनी सिक्रेट सांगितले!
Baba Ramdev Patanjali : भारताला आयुर्वेदाचा समृद्ध असा वारसा आहे. पूर्वी औषधी वनस्पतींच्या मदतीने रुग्णावर उपचार केले जाचे. तसेच आरोग्य...
Patanjali: पतंजलीचे खास दिव्य कायाकल्प तेल, ‘या’ गंभीर समस्यांवर रामबाण उपाय
पीठ मळल्यानंतर किती तासात खराब होतं? तुम्हीही करतायत का दुर्लक्ष?
ICC ODI Ranking – गोलंदाजांमध्ये जोफ्रा आर्चरची जोरदार मुसंडी; फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल पाचमध्ये टीम इंडियाच्या खेळाडूंचा दबदबा कायम
तहसीलदार प्रशांत थोरात यांचे निलंबन रद्द, शासकीय खुर्चीत बसून गायले होते गाणे
शेजारील देशांमध्ये काय चाललेय पहा! सुप्रीम कोर्टाचा मोदी सरकारला टोला; नेपाळ, बांगलादेशचा उल्लेख
Ratnagiri News – तिहेरी हत्याकांडप्रकरणी दुर्वास पाटीलच्या वडिलांना अटक