Ganesh Chaturthi 2025 – गजानना श्री गणराया आधी वंदू तुज मोरया! देशभरात लाडक्या गणरायाचे आगमन

Ganesh Chaturthi 2025 – गजानना श्री गणराया आधी वंदू तुज मोरया! देशभरात लाडक्या गणरायाचे आगमन

Ganesh Chaturthi 2025 –  गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात बाप्पाचे आगमन झाले आहे. देशभरात सर्व राज्यांमध्ये गणेश चतुर्थी हा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरी केली जात आहे. 27 आॅगस्टला घरगुती बाप्पांचे आगमन मोठ्या थाटामाटात झालेले आहे. तसेच सार्वजनिक मंडळांच्या बाप्पाच्या मूर्तीही आता विराजमान होण्याच्या तयारीमध्ये आहेत. घरगुती गणपतीची प्राणप्रतिष्ठापना मोठ्या भक्तीभावाने होण्यास सुरुवात झालेली आहे.

अवघ्या देशभरामध्ये गणेश उत्सव हा मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे. लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी घरोघरी मखर, आरास सजले असून, मोठ्या भक्तीभावाने गणरायाचे मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जात आहे.

मुंबईसह पुण्यातील रस्त्यांवर बाप्पाच्या आगमनाच्या मिरवणुका दिसू लागल्या आहेत. तसेच ढोल ताशांच्या गजरामध्ये गणरायाचे स्वागत केले जात आहे. जंगी सुरु असलेल्या मिरवणुकांमधून बाप्पांच्या आगमनाची ग्वाही दिली जात आहे. त्यासोबतच गणपती बाप्पा मोरयाचा जयजयकार सर्वठिकाणी दुमदुमत आहे.

गणेश उत्सवातील काही महत्त्वाचे दिवस

 

27 ऑगस्ट 2025- गणेश चतुर्थी या दिवशी पहाटे 4:50 ते दुपारी 1:53 पर्यंत कधीही घरगुती गणेशाची स्थापना करता येईल.

31 ऑगस्ट 2025 : गौरी आवाहन अनुराधा नक्षत्रावर सूर्योदयापासून सायंकाळी 5.27 पर्यंत आपल्या परंपरेप्रमाणे गौरी आवाहन करावे.

1 सप्टेंबर 2025 : गौरी पूजन

2 सप्टेंबर 2025 : गौरी विसर्जन मूळ नक्षत्रावर सूर्योदयापासून रात्री 9:51 पर्यंत गौरी विसर्जन करावे.

6 सप्टेंबर 2025 : अनंत चतुर्दशी

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;