चार गोष्टी जीवनात आणा उद्योगपती बना! उद्योगपती आर.जी. शेंडे यांचा मराठी तरुणांना कानमंत्र

चार गोष्टी जीवनात आणा उद्योगपती बना! उद्योगपती आर.जी. शेंडे यांचा मराठी तरुणांना कानमंत्र

>> योगेश जोशी

प्रत्येक लहानमोठ्या गोष्टींमध्ये संधी असते. ती संधी शोधून त्याचे सोने करावे लागते. यशस्वी उद्योजक बनण्यासाठी चार C गरजेचे आहे. त्यातील पहिला C म्हणजे Confidence स्वतःवर आत्मविश्वास असणे ही पहिली गरज आहे. दुसरा C म्हणजे Courage धैर्य आणि धाडस असणे ही दुसरी गरज आहे. हे दोन C तुमच्यात असतील तर इतर गोष्टी सहज साध्या होतात. आणि इतर दोन C म्हणजे Capability आणि Commitment या आहेत. धाडसाने स्वीकारलेले आव्हान पूर्ण करण्यासाठी क्षमता विकसीत करणे आणि सातत्याने त्या वाढवत राहणे गरजेचे आहे. तसेच कोणत्याही उद्योगात Commitment म्हणजे दिलेला शब्द पाळणे खूप महत्त्वाचे आहे. या चार गोष्टी अंगी बाणवल्या की यशस्वी उद्योजक बनता येते, असा कानमंत्र प्रसिद्ध मराठी उद्योजक आर.जी. शेंडे यांनी तरुणांना दिला आहे.

आर. जी. शेंडे श्री रेफ्रिजरेशन्स लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. त्यांनी त्यांच्या यशाचे गमक, उद्योगात आलेली आव्हाने, त्यावर केलेली मात आणि पुढील वाटचालीसाठी ठेवलेली ध्येय याची माहिती दिली. श्री रेफ्रिजरेशन्सने हिंदुस्थानातील डेटा सेंटरसाठी अत्याधुनिक कूलिंग सोल्यूशन्स सादर करण्यासाठी स्मार्ड्ट चिलर्स प्रायव्हेट लिमिटेडसोबत हातमिळवणी केली. त्यावेळी त्यांनी दिलखुलास संवाद साधत मराठी तरुणांना उद्योजक बनण्यासाठी मार्ददर्शन केले.

श्री रेफ्रिजरेशन्स लिमिटेडची ही धोरणात्मक भागीदारी भारतीय संरक्षण HVAC&R क्षेत्रातील अग्रगण्य कंपनीला अत्याधुनिक ऑइल-फ्री चिलर्स उपलब्ध करून देण्यास सक्षम करेल. त्यामुळे देशातील डेटा सेंटर विभागात अधिक कार्यक्षम कूलिंग सोल्यूशन्सची वाढती मागणी पूर्ण होऊ शकेल. या भागीदारीतून एसआरएल अत्याधुनिक मॅग्नेटिक बेअरिंग चिलर टेक्नॉलॉजी, जी विशेषतः मिशन-क्रिटिकल डेटा सेंटरसाठी डिझाइन केली जाते. तेच तंत्रज्ञान देशात आणण्यात येणार आहे.

जागतिक आघाडीच्या कंपनीसोबतची ही भागीदारी एसआरएलच्या वाढीच्या दीर्घकालीन धोरणाशी सुसंगत आहे. या महत्त्वपूर्ण घडामोडीबद्दल बोलताना आर. जी. शेंडे म्हणाले की, डेटा सेंटर्ससाठी उच्चतम कार्यक्षमता आणि अखंडित सेवा अत्यंत महत्त्वाची असते. स्मार्ड्टसोबतच्या भागीदारीतून आम्ही भारतीय ग्राहकांना अत्याधुनिक मॅग्नेटिक बेअरिंग चिलर तंत्रज्ञान देऊ शकतो. त्यामुळे आमची मिशन-क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चरला कार्यक्षम आणि विश्वसनीय कूलिंग सोल्यूशन्स पुरवण्याची क्षमता अधिक मजबूत होईल. संरक्षण क्षेत्रात, विशेषतः युद्धनौका आणि पाणबुड्यांमध्ये आम्ही आधीच अग्रणी असल्यामुळे, डेटा सेंटर क्षेत्रातही आम्ही ग्राहकांना उत्तम सोवा देऊ याची आम्हाला खात्री आहे. संरक्षण आणि औद्योगिक कूलिंग क्षेत्रातील आमच्या नेतृत्वाबरोबरच आता झपाट्याने वाढणाऱ्या डेटा सेंटर क्षेत्रात आमचा प्रवेश होत आहे. हा आमच्या प्रवासातील मैलाचा दगड आहे, असे त्यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कच्चे केळे खाल्ल्याने आरोग्यासाठी होतील ‘हे’ अद्भुत फायदे कच्चे केळे खाल्ल्याने आरोग्यासाठी होतील ‘हे’ अद्भुत फायदे
केळी प्रत्येक ऋतूत सहज उपलब्ध असते, जी लहान मुलांपासून ते प्रौढांपर्यंत सर्वजण आवडीने खातात. आपण पिकलेल्या केळ्यांबद्दल नाही तर कच्च्या...
उद्धव ठाकरे शिवतीर्थवर, राज ठाकरे यांची भेट घेतली
दररोज नाश्त्यात एक वाटी भिजवलेले चणे खाण्याचे शरीराला काय फायदे मिळतील, वाचा
समृद्धी महामार्गावर ठोकले खिळे; अनेक गाड्यांचे टायर फुटले, मध्यरात्री नेमकं काय घडलं?
संगमेश्वर देवरुख मार्गावर प्रवास करणे अवघड; खड्डे भरूनही रस्त्यांची दुर्दशा कायम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
बीड जिल्हा हादरला; परळीत अल्पवयीन मुलीला उचलून नेत सामूहिक अत्याचार, चार नराधम पोलिसांच्या ताब्यात
वजन कमी करण्यासोबतच त्वचेलाही ग्लो आणेल हा गरम मसाला, वाचा या मसाल्याचे आरोग्यवर्धक फायदे