कच्चे केळे खाल्ल्याने आरोग्यासाठी होतील ‘हे’ अद्भुत फायदे
केळी प्रत्येक ऋतूत सहज उपलब्ध असते, जी लहान मुलांपासून ते प्रौढांपर्यंत सर्वजण आवडीने खातात. आपण पिकलेल्या केळ्यांबद्दल नाही तर कच्च्या केळ्यांबद्दल आज आरोग्याच्या दृष्टीने फायदे जाणून घेणार आहोत. कच्चे केळे हे अनेक औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहे. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. तसेच मधुमेह आणि अतिसाराच्या समस्यांमध्ये कच्चे केळे हे उत्तमरीत्या काम करते.
‘हे’ पाणी महिलांसाठी वरदानापेक्षा कमी नाही! दररोज या पाण्याच्या सेवनाने चेहऱ्यावर येईल अनोखी चमक
कच्च्या केळ्यांमध्ये फायबर भरपूर असते. यामुळे आपले पोट बराच काळ भरलेले राहते. त्यामुळेच वजन कमी होण्यास मदत होते.
उन्हाळ्यात अतिसाराची समस्या अधिक सामान्य आहे. अशावेळी कच्च्या केळ्याचे सेवन खूप फायदेशीर ठरते. तसेच उलट्या, थकवा, मळमळ आणि डोकेदुखी कमी करण्यासाठी हे खूप प्रभावी मानले जाते.
दररोज सकाळी रिकाम्या पोटी 1 आवळा खाल्ला तर त्याचा आरोग्यावर काय परिणाम होईल? वाचा
कच्च्या केळ्यापासून अनेक प्रकारचे पदार्थ बनवता येतात आणि त्यांच्या सेवनाने पचनसंस्था देखील चांगली राहते. यामुळे अपचन, गॅस, आम्लता किंवा बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर तुम्ही ते तुमच्या आहारात समाविष्ट करून पाहू शकता. यामुळे अन्न लवकर पचण्यास मदत होईल आणि पोटात जडपणा जाणवणार नाही.
कच्चे केळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी औषधापेक्षा कमी नाही. यामध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स असल्याने, इन्सुलिन हार्मोन हळूहळू बाहेर पडतो. यामुळे शरीरातील साखर नियंत्रित करण्यास मदत होते.
कच्चे केळे जीवनसत्त्वे सी, ई, बी६ आणि के ने समृद्ध आहे. त्याचे सेवन शरीराला अनेक एंजाइमॅटिक प्रक्रियांमध्ये मदत होते. त्यामुळे आपला चयापचय देखील वाढतो. अशा परिस्थितीत, पोट फुगण्याची समस्या देखील दूर होते आणि अन्न लवकर पचते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List