हा देश फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालणार – सुप्रिया सुळे

हा देश फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालणार – सुप्रिया सुळे

जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात पुणे येथे महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा तथा खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. सुप्रिया सुळे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आंदोलनात सहभागी झाले. सरकारने आणलेला जनसुरक्षा कायदा हा संविधान विरोधी आहे. नक्षलवाद संपवल्याचा दावा सरकार करत आहे, तसेच नक्षलवादासाठी कायदे आधीपासूनच अस्तित्वात असताना नवीन कायदा कशासाठी? असा सवाल उपस्थित करत सरकारने हा कायदा मागे घ्यावा, अशी मागणी यावेळी सुप्रिया सुळे यांनी केली. याप्रसंगी महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

भारतीय संविधानाचा विजय असो, जनसुरक्षा कायदा रद्द करा, अशा घोषणाबाजी करत हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. पुण्यात आंदोलनावेळी माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, महाविकास आघाडीमध्ये तुम्हाला आठवत असेल जेव्हा माननीय उद्धवजी स्वतः असेंब्लीमध्ये आले होते त्यावेळेस काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष असेल आम्ही सगळ्यांनी मिळून हा कायदा आणला होता, तेव्हा सगळ्यांनीच याचा विरोध केला होता. मला एकाच गोष्टीचे आश्चर्य वाटते की एकीकडे हे सरकार सातत्याने सांगत आहे की हे या देशातून नक्षलवाद संपवला असे हे केंद्र सरकार नाहीतर राज्यातील सरकार सांगत आहे. तर मग नक्षलवादाच्या विरोधात आधीच आपल्याकडे कायदे असताना आणखी एक कायदा कशासाठी? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे.

पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, सगळ्या समाजात अशी एक चर्चा आहे की हा फक्त की असे कायदे आणून संविधानाच्या विरोधी घेतलेला हा निर्णय आहे. हा देश कोणाच्या मन मर्जी चालणार नाही. हा देश फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालणार आणि म्हणून या विधेयकाचा महाविकास आघाडी म्हणून विरोध तर आहेच पण जबाबदार नागरिक या नात्याने विरोध करू. आमची विनंती आहे हे विधेयक मागे घेण्यात यावे. असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवर प्रश्न विचारण्यात आला असता सुप्रिया सुळे म्हणाल्या की, गुप्त मतदान असताना मग कसे कळणार की त्यात कोणत्या पक्षाने क्रॉस व्होटिंग केले? वायएसआर काँग्रेस हा पक्ष इंडिया आघाडीत नाही. तुम्हाला कसे माहीत आहे की गुप्त मतदान असताना कोणती मते फुटली हे कसे समजेल? असे आरोप जर केले जात आहेत तर राहुल गांधी जे म्हणतात ते खरेच आहे व्होट चोरी झाली. असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पुणे साखळी बॉम्बस्फोटातील आणखी एका आरोपीला जामीन; हायकोर्टाचा सरकारी पक्षाला दणका पुणे साखळी बॉम्बस्फोटातील आणखी एका आरोपीला जामीन; हायकोर्टाचा सरकारी पक्षाला दणका
12 वर्षांपूर्वी पुण्यात घडलेल्या साखळी बॉम्बस्फोटाच्या प्रकरणातील आणखी एका आरोपीला बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. बॉम्बस्फोटाच्या खटल्यात काहीही...
बावनकुळेंनी दिलेल्या पुराव्यांवरुनच रोहित पवारांनी केली भाजपची पोलखोल, मेघा इंजिनियरींगवरून भाजपला फटकारले
IND Vs UAE – 15 सामने आणि 225 दिवसांची प्रतिक्षा अखेर संपलीच, सूर्यकुमार यादवने करून दाखवलं
Ratnagiri News – कोकण कृषी विद्यापीठाच्या भरती प्रक्रियेत अनियमितता; महाविकास आघाडीचा आंदोनाचा इशारा
Palghar News – डहाणूहून विरारकडे जाणाऱ्या लोकलमध्ये बिघाड, ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांची गैरसोय
Photo – थरारक! दशावतार चित्रपटातील दिलीप प्रभावळकरांचे लूक पाहून व्हाल थक्क
125 किलोवरून थेट 55 किलो! महिलेने वजन कमी कसे केले? रामदेव बाबांनी सिक्रेट सांगितले!