दररोज नाश्त्यात एक वाटी भिजवलेले चणे खाण्याचे शरीराला काय फायदे मिळतील, वाचा
आपल्या आरोग्यासाठी नैसर्गिक उपाय हे केव्हाही बेस्ट ठरतात. म्हणूनच आता अनेकजण नैसर्गिक उपचारांकडे वळू लागले आहेत. औषधांवर खर्च करण्यापेक्षा नैसर्गिक उपचार हे केव्हाही उत्तम मानले जात आहेत. आपल्या आरोग्यासाठी काळे चणे हे खूप फायदेशीर आहेत. काळे चणे हे आरोग्यासाठी वरदानापेक्षा कमी नाहीत.
काळ्या चण्यामध्ये प्रथिने, फायबर, लोह यासह विविध पोषक तत्वे भरपूर असतात. यामुळे आपल्या शरीराला विविध आरोग्यवर्धक फायदे मिळतात. दररोज सकाळी रात्री पाण्यात भिजवलेले चणे खाल्ल्याने तुमच्या शरीरात कोणते बदल येऊ शकतात?
दररोज सकाळी रिकाम्या पोटी 1 आवळा खाल्ला तर त्याचा आरोग्यावर काय परिणाम होईल? वाचा
चण्यामध्ये फायबर असते आणि जर तुम्ही दररोज भिजवलेले चणे खाल्ले तर त्यात असलेले फायबर तुम्हाला बद्धकोष्ठता किंवा पोटफुगीसारख्या पोटाच्या समस्यांपासून मुक्ती मिळते.
काळे चणे फायबरने समृद्ध असतात. यामुळे आपल्या आतड्यांच्या हालचाली नियंत्रित करण्यास, बद्धकोष्ठता रोखण्यास आणि पचनसंस्थेला चालना देण्यास मदत करतात.
‘हे’ पाणी महिलांसाठी वरदानापेक्षा कमी नाही! दररोज या पाण्याच्या सेवनाने चेहऱ्यावर येईल अनोखी चमक
काळ्या चण्यामध्ये असलेले उच्च फायबर आणि प्रथिने वजन कमी करण्यास उत्तम मानले जाते. म्हणूनच वजन कमी करताना काळ्या चण्यांचा आहारात समावेश करणे गरजेचे आहे.
भिजवलेले काळे चणे त्वचेसाठी खूप चांगले असते. त्यात भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात जे मुक्त रॅडिकल्सशी लढतात आणि त्वचेचे नुकसान टाळतात.
काळ्या चणे हे लोहाचा एक उत्तम स्रोत आहे. विशेषतः शाकाहारी लोकांमध्ये हे चणे खाल्ल्यामुळे हिमोग्लोबिनची पातळी सुधारण्यास आणि अशक्तपणा रोखण्यास मदत करू शकते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List