उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भेटीत नक्की काय घडलं? संजय राऊत यांनी दिली संपूर्ण माहिती
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची त्यांच्या छत्रपती शिवाजी पार्क येथील शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली. तेव्हापासून वेगवेगळ्या राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्यात काय चर्चा झाली असे याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये तर्क लावले जात होते. या भेटीच्या वेळी शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत देखील होते. त्यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.
उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्या भेटीत कोणतंही राजकारण नव्हतं. गणपतीच्या वेळी उद्धवजी राज ठाकरेंच्या घरी गेले होते तेव्हा राज ठाकरेंच्या आई म्हणजेच उद्धव ठाकरेंच्या मावशी/काकी या उद्धव ठाकरे यांना म्हणाल्या की आज फार गर्दी होती त्यामुळे व्यवस्थित बोलता नाही आलं. तु पुन्हा ये असं त्या म्हणाल्या. त्यामुळे आज उद्धव ठाकरे त्यांना भेटायला गेले होते”, असे संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं.
उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्या आजच्या भेटीवेळीशिवसेना नेते, खासदार संजय राऊत, आमदार अॅड. अनिल परब, मनसे नेते बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे उपस्थित होते.
याआधी गणेशोत्सवादरम्यान उद्धव ठाकरे यांनी सहकुटंब शिवतीर्थ येथे जाऊन राज ठाकरे यांच्या घरच्या गणपती बाप्पाचे दर्शनही घेतले होते. यावेळी सौ. रश्मी ठाकरे, शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे उपस्थित होते. त्यानंतर आता पुन्हा ठाकरे बंधुंची भेट होत आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List