चोराला पकडणाऱ्या पोलिसांचा गौरव; धावत्या बसमधून मोबाईल चोरणाऱ्यावर १५ मिनिटांत झडप

चोराला पकडणाऱ्या पोलिसांचा गौरव; धावत्या बसमधून मोबाईल चोरणाऱ्यावर १५ मिनिटांत झडप

कल्याणमध्ये धावत्या बसमधून प्रवाशाचा मोबाईल हिसकावून पळणाऱ्या एका सराईत चोरट्याला पोलिसांनी फिल्मी स्टाईल पाठलाग करून पकडले. ड्रग्जचे सेवन केलेल्या चोरट्याने पोलिसांवर दगड उगारला. मात्र पोलीस उपनिरीक्षक अनिकेत नाईक यांनी धाडसाने त्याच्या मुसक्या आवळल्या. या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन कल्याण परिमंडळ ३ चे उपायुक्त अतुल झेंडे यांनी पोलिसांचा गौरव केला.

महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक येथे अनिकेत नाईक प्रशिक्षण घेत आहेत. गणेशोत्सव सणासाठी त्यांची कल्याण बाजारपेठ पोलीस ठाण्यात नेमणूक केली होती. २ सप्टेंबर रोजी वल्लीपिर चौक येथे ते पोलीस पथकासह बंदोबस्त ड्युटी करत होते. यादरम्यान नवी मुंबई परिवहन बसमधून प्रवाशाचा मोबाईल हिसकावून अमीर कलीम शेख या चोरट्याने पळ काढला. चौकात बस येताच पोलिसांना बघून चालकाने गाडी थांबवली. वाहकाने पळत येऊन चोरट्याने मोबाईल हिसकावल्याचे पोलिसांना सांगितले. चोरट्याचे वर्णन विचारून पीएसआय अनिकेत नाईक यांनी तातडीने हवालदार टोकरे यांच्या दुचाकीवरून चोरट्याचा पाठलाग केला. एक किमी अंतर गेल्यानंतर संशयित चोरटा दिसला. मात्र पोलिसांना पाहताच तो पळू लागला. याचवेळी प्रसांगावधान राखून नाईक यांनी बाईकवरून उडी मारून पाठलाग करून चोरट्याला पकडले.

अनिकेत नाईक यांच्या धाडसाचे कौतुक
अमीर शेख हा सराईत चोरटा आहे. त्याच्याकडून पोलिसांनी चोरीची बाईक, ड्रग्ज घेतलेले इंजेक्शन हस्तगत केले. ड्रग्ज घेऊन चोरी करत असल्याची त्याने कबुली दिली. कल्याण परिमंडळ ३ चे उपायुक्त अतुल झेंडे यांनी प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक अनिकेत नाईक यांच्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन प्रशस्तिपत्र देऊन त्यांचा गौरव केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कच्चे केळे खाल्ल्याने आरोग्यासाठी होतील ‘हे’ अद्भुत फायदे कच्चे केळे खाल्ल्याने आरोग्यासाठी होतील ‘हे’ अद्भुत फायदे
केळी प्रत्येक ऋतूत सहज उपलब्ध असते, जी लहान मुलांपासून ते प्रौढांपर्यंत सर्वजण आवडीने खातात. आपण पिकलेल्या केळ्यांबद्दल नाही तर कच्च्या...
उद्धव ठाकरे शिवतीर्थवर, राज ठाकरे यांची भेट घेतली
दररोज नाश्त्यात एक वाटी भिजवलेले चणे खाण्याचे शरीराला काय फायदे मिळतील, वाचा
समृद्धी महामार्गावर ठोकले खिळे; अनेक गाड्यांचे टायर फुटले, मध्यरात्री नेमकं काय घडलं?
संगमेश्वर देवरुख मार्गावर प्रवास करणे अवघड; खड्डे भरूनही रस्त्यांची दुर्दशा कायम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
बीड जिल्हा हादरला; परळीत अल्पवयीन मुलीला उचलून नेत सामूहिक अत्याचार, चार नराधम पोलिसांच्या ताब्यात
वजन कमी करण्यासोबतच त्वचेलाही ग्लो आणेल हा गरम मसाला, वाचा या मसाल्याचे आरोग्यवर्धक फायदे