चंद्रपूरात बीएसएनएल कॉपर केबल चोरीचा 24 तासांत उलगडा; दोन आरोपींना अटक, 44 लाखांचा मुद्देमाल जप्त
चंद्रपुरमध्ये बीएसएनएलचे 24 लाख रुपयांचे कॉपर केबल चोरी करणाऱ्या टोळीवर चंद्रपूर जिल्हा पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत फक्त 24 तासांत दोन आरोपींना अटक करून चोरीचा माल हस्तगत केला आहे. आरोपींनी हेल्मेट, रिफ्लेक्टर, जॅकेट आणि प्लॅस्टिक बॅरीकेटचा वापर करून स्वतःला कंत्राटी कामगार भासवत केबल कापल्याचे निष्पन्न झाले.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रामनगर पोलीस ठाण्यातील गुन्ह्याचा तपास करताना गुप्त माहितीच्या आधारे आयशर ट्रक पकडला. त्यातून चोरीचा बीएसएनएल कॉपर केबल तसेच वाहन, साहित्य असा एकूण ४४ लाख ४८ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अटक आरोपींची नाव नरेंद्र सोरनसिंह मौर्या (२२, उधैनी, उत्तरप्रदेश) व नाजीम शोख असमुद्दीन शेख (२६, कलपीया, बदायु, उत्तरप्रदेश) अशी आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांनी केली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List