Asia Cup 2025 – एकेकाळी शुभमन गिलसोबत करायचा सराव, हा हिंदुस्थानी वंशाचा खेळाडू आता करतोय UAE चं प्रतिनिधित्व

Asia Cup 2025 – एकेकाळी शुभमन गिलसोबत करायचा सराव, हा हिंदुस्थानी वंशाचा खेळाडू आता करतोय UAE चं प्रतिनिधित्व

Asia Cup 2025 मध्ये टीम इंडिया आपला पहिला सामना आज UAE विरुद्ध खेळणार आहे. दुबईमध्ये उभय संघांमध्ये रात्री 8 वाजता सामन्याला सुरुवात होईल. या सामन्यात टीम इंडियाचे पारडे जड मानले जात आहे. शुभमन गिल 12 वर्षांचा असताना त्याच्यासोबत सराव केलेला आणि सध्या UAE संघाचा फिरकीपटू असलेला सिमरनजीत सिंह सुद्धा खेळणार आहे.

सिमरनजीत सिंह हा मुळ पंजाबचा आहे. परंतु आता तो UAE देशाचं प्रतिनिधीत्व करत आहे. मोहालीच्या PCA अ‍ॅकेडमीमध्ये शुभमन गिल आणि सिमरनजीत सिंह यांनी एकत्र सराव केल्याचे PTI ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सिमरनजीतने सांगितले आहे. त्याने सांगितले की, ही गोष्ट 2011-12 ची आहे. तेव्हा शुभमन गिल 11-12 वर्षांचा होता आणि वडिलांसोबत मोहालीला येत असे. आम्ही सकाळी 6 ते 11 वाजेपर्यंत सराव करायचो. त्यानंतर शुभमन गिल नेटमध्ये फलंदाजीचा सराव करायचा, तेव्हा मी त्याला अनेकदा त्याच्यासाठी गोलंदाजी केली आहे. परंतु आज तो मला ओळखेल की नाही हे माहित नाही, परंतु मी त्याला लहानपणापासून ओळखत आहे.

निर्णायक युद्धापूर्वी हिंदुस्थानची तयारी, यूएईविरुद्ध प्रयोग करण्याची हिंदुस्थानला संधी

सिमरनजीत सिंहने मोहालीमध्ये आपल्या क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर जिल्हा स्तरावर सुद्धा त्याने चमकदार कामगिरी केली. त्यामुळे 2017 साली रणजीच्या संभाव्य खेळाडूंच्या यादीमध्येही त्याचं नाव होतं. तसेच पंजाब किंग्ज संघासाठी नेटमध्येही त्याने गोलंदाजी केली आहे. परंतु टीम इंडियाच्या संघात त्याला स्थान मिळवता आले नाही. अशातच त्याला 2021 साली दुबई प्रॅक्टीस कॅम्पची ऑफर मिळाली आणि त्याच्या आयुष्याला सुद्धा कलाटणी मिळाली. सिमरनजीत सिंह सध्याच्या घडीला UAE संघाचा महत्त्वपूर्ण खेळाडू आहे. 35 वर्षीय सिमरनजीतने आतापर्यंत 12 टी-20 सामन्यांमध्ये 15 विकेट घेतल्या आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;