गोकुळच्या वार्षिक सभेत यंदाही काला, महायुतीचे अध्यक्ष असूनही महायुतीचा विरोध, सभा अर्ध्यावर सोडून सभासदांचा काढता पाय
पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या गोकुळ दूध उत्पादक संघाची 63 वी वार्षिक सर्वसाधारण सभा दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रचंड गदारोळात संपन्न झाली. महायुतीचा अध्यक्ष असलेल्या सत्ताधाऱ्यांकडून ही सभा सुरळीत आणि समाधानकारक संपन्न झाल्याचा दावा केला असला तरी दुसरीकडे मात्र यापुर्वी विरोधी गटाचे नेतृत्व म्हणून ओळखणाऱ्या गोकुळच्या संचालिका भाजपच्या शौमिका महाडिक यांनी यावेळीही सभेत आपल्याला समाधानकारक उत्तर न मिळाल्याने संताप व्यक्त केला. गोकुळची सभा सुरू होताना सभा मंडप तुडुंब भरला होता. पण अध्यक्ष मुश्रीफ ठरावाचे वाचन करत असतानाच सभासदांनी सभा मंडपातून काढता पाय घेतल्याचे दिसून आले.
एपंदरीत मंगळवारी (दि.9) गोकुळ दूध संघाची सभा ही गोकुळची नसून ही महाडिक विरुद्ध शाहू आघाडीची असल्याचे दिसून आले. या सभेत शौमिका महाडिक यांच्या प्रश्नांची उत्तरे लेखी स्वरूपात देणार असल्याचे जाहीर करण्यात आले. सभासदांचे प्रश्न विचारत असताना शौमिका महाडिक यांनी त्यांचा माईक बंद केल्याचा आरोप केला. यावेळी सत्ताधारी सभासदांकडून जोरदार घोषणाबाजी होऊ लागल्याने गोंधळ निर्माण झाला. शेवटी मंजूर…मंजूर…च्या जयघोषात सत्ताधाऱ्यांनी सर्वच ठराव मंजूर करत सभा संपवली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List