उरणमधील आगीचा मुंबईतील गॅस पुरवठ्यावर परिणाम, लाखो वाहनचालकांना फटका बसण्याची शक्यता
उरण येथील ऑइल ऍण्ड नॅचरल गॅस कॉर्पोरेशनच्या वायू प्रक्रिया प्रकल्पात लागलेल्या आगीचा मुंबई शहरातील गॅस पुरवठय़ावर मंगळवारी मोठा परिणाम झाला. महानगर गॅस लिमिटेडच्या वडाळय़ातील सिटी गेट स्टेशनवर होणारा गॅस पुरवठा बाधित झाला. याबरोबरच अन्य सीएनजी स्टेशनवरील गॅस पुरवठाही प्रभावित होऊन वाहनचालकांना फटका बसण्याची शक्यता आहे.
ओएनजीसीच्या उरण प्लांटमध्ये सोमवारी दुपारी आगीचा भडका उडाला. ओएनजीसीच्या अग्निशमन दलाने दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर ती आग विझवली. त्या आगीचा परिणाम मुंबई शहरातील गॅस पुरवठय़ावर झाला आहे. गॅस पुरवठय़ाच्या कमी दाबामुळे सीएनजीच्या पुरवठय़ावर परिणाम झाला आहे.
परिस्थिती पूर्वपदावर येण्यास वेळ लागणार
महानगर गॅस लिमिटेडने घरगुती वापरासाठी असलेल्या पीएनजी ग्राहकांचा पुरवठा सुरळीत सुरू ठेवण्यास प्राधान्य दिले आहे, मात्र गॅस पुरवठा पूर्ववत होण्यास वेळ लागणार असल्याचे कंपनीने एका निवेदनाद्वारे स्पष्ट केले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List