ट्रेंड – अन्न वाया घालवाल तर…

ट्रेंड – अन्न वाया घालवाल तर…

अन्न कधी वाया घालवू नये, अन्नाची नासाडी करू नये, असे आपल्याला शिकवलेले असते. मात्र तरीही आपल्या हातून बऱ्याचदा अन्न वाया जाते. विशेषतः हॉटेलमध्ये गेल्यावर आपण विविध पदार्थ मागवतो आणि त्यातील काही पानात टाकून निघून जातो. अशा लोकांसाठी पुण्यातील एका रेस्टॉरंटने अनोखा फंडा शोधलाय. या रेस्टॉरंटच्या मेन्यूचा फोटो सध्या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून मोठय़ा प्रमाणात शेअर केला जातो आहे. एक ग्राहक पुण्याच्या या रेस्टोरंटमध्ये खायला गेला होता. यादरम्यान त्याचे लक्ष मेनू बोर्डच्या फोटोमध्ये रेस्टॉरंटमध्ये उपलब्ध असलेल्या विविध खाद्यपदार्थांची यादीकडे गेले. पण, या सगळ्या मेन्यूमध्ये लक्ष वेधून घेणारी तळाशी लिहिलेली एक ओळ होती. ज्यामध्ये ‘अन्न वाया घालवल्याबद्दल तुम्हाला 20 रुपये जास्तीचे द्यावे लागतील’ असे लिहिण्यात आले होते. ग्राहकाने या सूचनेचा फोटो @rons1212 या एक्स अकाऊंटवरून शेअर केलाय.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

राज्यातील होमिओपॅथी डॉक्टरांना दिलासा, सीसीएमपी कोर्स केलेल्या डॉक्टरांची एमएमसीमध्ये नोंद होणार राज्यातील होमिओपॅथी डॉक्टरांना दिलासा, सीसीएमपी कोर्स केलेल्या डॉक्टरांची एमएमसीमध्ये नोंद होणार
राज्यातील होमिओपॅथी डॉक्टरांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारने सीसीएमपी अर्थात सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकोलॉजी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या डॉक्टरांची...
धुवाधार पावसाने ठाणे, पालघरकरांना झोडपले; हवामान विभागाचा रेड अलर्ट
नातवासोबत घट्ट नाते असले तरी आजी पालकांपेक्षा श्रेष्ठ नाही, हायकोर्टाचा आई-वडिलांना दिलासा
भक्तीचा महासागर लोटणार! लाडक्या गणरायाला आज निरोप, कडेकोट बंदोबस्त… 18 हजार पोलीस तैनात, 10 हजार कॅमेरे, ड्रोनचीही नजर
मराठा आरक्षणाच्या जीआरचा वाद संपेना, भाजपने आपला डीएनए लक्षात ठेवावा; भुजबळांचा इशारा… आता कोर्टात जाण्याशिवाय पर्याय नाही
विसर्जनाला जाताय… हे लक्षात असू द्या!
मुंबईवर आत्मघाती हल्ल्याची धमकी, 34 वाहनांमध्ये 34 मानवी बॉम्ब… 400 किलो; आरडीएक्स पेरल्याचा दावा, पोलिसांकडून कसून तपास