सातपाटीच्या चवदार चंदेरी पापलेटचे उत्पादन घटू लागले; सरंग्याच्या पिलांची सर्रास मासेमारी

सातपाटीच्या चवदार चंदेरी पापलेटचे उत्पादन घटू लागले; सरंग्याच्या पिलांची सर्रास मासेमारी

>> सचिन जगताप

१ ऑगस्टपासून सुरू झालेल्या नव्या मासेमारी हंगामात इतर माशांचे उत्पादन समाधानकारक असले तरी राज्य मासा म्हणून घोषित करण्यात आलेले चवदार चंदेरी पापलेट (सरंगा) मात्र जाळ्यात गावेनासे झाले आहेत. बंदी असूनही या पापलेटच्या पिलांची मासेमारी सर्रास सुरू असल्याने गेल्या हंगामात अवघे १३६ टन पापलेट मिळाल्याची नोंद झाली असून आणखी काही वर्षांनी सरंग्याची प्रजाती लुप्त होईल की काय, अशी भीती मच्छीमार व्यक्त करत आहेत.

पालघरमधील पापलेट हे त्याच्या चवीमुळे जगप्रसिद्ध आहे. मात्र एकीकडे पर्यावरण बदलाचे संकट घोंगावत असून कायद्याने बंदी असतानाही चंदेरी पापलेटच्या पिलांची मोठ्या प्रमाणावर सर्रास मासेमारी होत आहे. त्याचा फटका चंदेरी पापलेटच्या उत्पादनावर होऊ लागला आहे. १९८८ मध्ये राज्यात सुमारे १२ हजार टन पापलेटचे उत्पादन होत होते. २०२२ मध्ये उत्पादन पाच हजार टनांखाली घसरले. सातपाटी येथील सहकारी संस्थांच्या आकडेवारीनुसार २०२३ मध्ये या पापलेटचे उत्पादन अवघे १३६ टन नोंदवले गेले आहे.

बाजारभाव आणि वजनातील तफावत

पापलेट मासा वजनाप्रमाणे वर्गीकृत केला जातो. सुपर सरंगा (५०० ग्रॅमपेक्षा जास्त) ते चार नंबर सरंगा (१००-२०० ग्रॅम) असा त्याचा दर्जा ठरतो. लहान पिल्लांची मासेमारी सुरू राहिल्यास भविष्यात ‘सुपर सरंगा’ हा मासा बाजारातून पूर्णपणे हद्दपार होण्याची शक्यता आहे.

पापलेटने किनाऱ्यापासून पळ काढला

काही भागात १०० ग्रॅमच्या आत असलेल्या पापलेटची सर्रास मासेमारी केली जात आहे. मासेमारी करताना मोठे ट्रॉलर्स जाळ्यात आलेल्या या चंदेरी पापलेटच्या पिलांना सोडून न देता विक्रीसाठी नेतात. या सर्रास मासेमारीमुळे चंदेरी पापलेटची संख्या घटू लागली आहे. पूर्वी ४० ते ४५ सागरी मैलांवर सापडणाऱ्या पापलेटने किनाऱ्यापासून पळ काढला असून आता १०० नॉटिकल मैलांपर्यंत ते गेले आहेत.

जनजागृती करणार, दंडही ठोठावणार

पालघर जिल्ह्यातील वसई, सातपाटी, अर्नाळा, डहाणू अशा मुख्य बंदरातील संस्थांची बैठक घेऊन प्रबोधन करण्यात आले असून जर बंदी असताना कोणी लहान मासे पकडताना आढळले तर त्यांना पाच पट दंडात्मक कारवाई करण्यात येईल. हा दंड एक लाख, दोन लाख व तिसऱ्यांदा आढळल्यास पाच लाख आकारण्यात येणार आहे. आतापर्यंत दोन बोटींवर कारवाई करण्यात आली आहे. १५ सप्टेंबरनंतर पोस्टर व बॅनर लावून जनजागृती करणार असल्याचे पालघर येथील मत्स्य अधिकारी निलेश पाटील यांनी सांगितले.

“जिल्ह्यात आमची कारवाई सुरू असून जर आम्हाला छोटे मासे विक्री करताना किंवा बोटीमध्ये लहान आकाराचे मासे आढळल्यास त्यांच्यावर सागरी कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येईल.”

– दिनेश पाटील, मत्स्यव्यवसाय अधिकारी, पालघर.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

तिहेरी हत्याकांडाचा तपास डिवायएसपींकडे, आरोपींना 8 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी तिहेरी हत्याकांडाचा तपास डिवायएसपींकडे, आरोपींना 8 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी
दुर्वास पाटील याने केलेल्या तिहेरी हत्याकांडचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश माईणकर यांच्याकडे सपुर्द करण्यात आला आहे.हत्याकांडातील चार आरोपीना ८...
पावसाळ्यात डेंग्यूपासून बचावासाठी काय करावं? जाणून घ्या तज्ञांचे मत….
न्या. चंद्रशेखर यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती पदाची घेतली शपथ
नगरपालिका निवडणुकांसाठी EVM ऐवजी मतपत्रिकेचा वापर करा, कर्नाटक मंत्रिमंडळाची राज्य निवडणूक आयोगाकडे मागणी
चुकीच्या पद्धतीने GST लागू केला, आता माफी मागण्याऐवजी गर्विष्ठपणे भेट दिल्याची जाहिरात करताय; आदित्य ठाकरे यांचा टोला
मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारे अभिनेते आशिष वारंग यांचं निधन
SA Vs ENG – दक्षिण आफ्रिकेने 27 वर्षांनी इंग्लंडचं मैदान मारलं, फक्त 5 धावांनी केलं चितपट