चेहऱ्यावर झटपट चमक येण्यासाठी ‘या’ गोष्टींचा वापर करा, सुंदरता पाहून थक्क व्हाल
चेहऱ्याच्या अनेक समस्यांना तोंड देण्यासाठी रासायनिक उत्पादने वापरत असाल तर ती सोडून द्या आणि नैसर्गिक गोष्टी वापरण्यास सुरुवात करा. बदलत्या हवामानात तुमची त्वचा कोरडी दिसत असेल तर तुम्ही तांदळाचे पीठ वापरावे. सध्याच्या घडीला आपल्याकडे कोरियन ब्युटी ट्रेंडसने धुमाकूळ घातला आहे. कोरियन ब्युटी ट्रिटमेंटमध्ये त्वचेची काळजी घेण्यासाठी, तांदूळ प्रामुख्याने वापरला जातो.
फेस पॅक बनवण्यासाठी लागण्याऱ्या २ महत्त्वाच्या गोष्टी
तांदळाचे पीठ
अॅलोवेरा जेल
या दोन गोष्टींनी फेस पॅक कसा बनवायचा
हा फेस पॅक बनवण्यासाठी, कोरफडीचे ताजे पान घ्या. आता दोन्ही बाजूंनी टोकदार कडा कापून घ्या. आता मधला भाग कापल्यानंतर, कोरफडीचा गर काढून एका भांड्यात गोळा करा. आता कोरफडीचे जेलमध्ये २ चमचे तांदळाचे पीठ घाला. ते चांगले मिसळून एक गुळगुळीत, दाणेदार पेस्ट बनवा. फेस पॅकचा पोत गुळगुळीत असावा.
हा फेस पॅक कसा लावायचा
हा फेस पॅक लावण्यापूर्वी चेहरा पूर्णपणे धुवा. हा फेस पॅक तुमच्या चेहऱ्यावर आणि मानेवर लावा, गोलाकार हालचालीत हलक्या हाताने मालिश करा. १५ मिनिटे तसेच राहू द्या जेणेकरून त्वचा या पॅकचे सर्व गुण शोषून घेऊ शकेल. १५ मिनिटांनी हा पॅक धुवा. लावल्यानंतर, त्वचा स्वच्छ, चमकदार आणि गुळगुळीत दिसेल.
फेस पॅक लावल्याने या समस्या दूर होतील-
हा फेस पॅक छिद्रांना खोलवर साफ करतो.
मृत त्वचेच्या पेशी काढून टाकते.
टॅनिंग आणि पिग्मेंटेशन कमी करते.
त्वचा मऊ आणि चमकदार बनवते.
फेस पॅकमध्ये असलेल्या घटकांचे फायदे
या फेस पॅकमध्ये वापरलेले तांदळाचे पीठ त्वचेला एक्सफोलिएट करण्यास मदत करते. चमकदार त्वचा मिळविण्यासाठी आठवड्यातून दोनदा या घटकाचा वापर करा. त्याच वेळी, कोरफड जेल त्वचेला हायड्रेट करते, आराम देते आणि छिद्रे साफ करते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List