पावसाळ्यात निस्तेज आणि तेलकट झालेली त्वचा चमकदार बनवण्यासाठी ‘हे’ 5 घरगुती फेस मास्क करा ट्राय

पावसाळ्यात निस्तेज आणि तेलकट झालेली त्वचा चमकदार बनवण्यासाठी ‘हे’ 5 घरगुती फेस मास्क करा ट्राय

पावसाळ्यात दमट वातावरणामुळे अनेकांच्या चेहऱ्यावरील चमक बऱ्याचदा कमी होऊ लागते. त्यात या दिवसांमध्ये चेहऱ्यावरील ताजेपणा टिकवून ठेवणे हे एखाद्या आव्हानापेक्षा कमी नसते. अशातच ज्या लोकांची त्वचा अधिच तेलकट असते त्यांना पावसाळा हा ऋतू आणखी आव्हानात्मक बनतो, कारण चेहऱ्यावर तेल वारंवार जमा होते, ज्यामुळे छिद्रे बंद होऊ लागतात आणि ब्रेकआउट म्हणजेच मुरुमांची समस्या वाढते.

बाजारात जरी ही समस्या दुर करण्यासाठीचे अनेक प्रोडक्ट आहेत. पण तुम्ही स्वयंपाक घरात असलेल्या काही गोष्टींचा वापर करून निस्तेज आणि तेलकट त्वचा बरे करू शकता. हे काही उपाय आहेत जे कोणत्याही साईड इफेक्टशिवाय त्वचेला ताजेतवाने ठेवते आणि नैसर्गिक चमक देखील परत आणते. जर तुम्हालाही तेलकट त्वचेचा त्रास होत असेल किंवा तुमच्या चेहऱ्यावरील चमक परत आणायची असेल तर तुम्ही हे 5 फेस मास्क वापरू शकता. ते कसे बनवायचे आणि कसे वापरायचे ते जाणून घेऊयात.

काकडी आणि कोरफड जेल फेस मास्क

काकडी आणि कोरफड जेलचा फेस मास्क त्वचेला ताजेतवाने करण्यासाठी सर्वात फायदेशीर आहे. हा मास्क चेहऱ्याला थंडावा देते आणि मृत त्वचा काढून नैसर्गिक चमक आणते. तर हा फेस मास्क बनवण्यासाठी 2 चमचे काकडीचा रस घ्या आणि त्यात एक चमचा कोरफड जेल मिक्स करा. आता तयार फेसमास्क तुमच्या चेहऱ्यावर व मानेवर लावा आणि 15 मिनिटांनी धुवा.

मुलतानी माती आणि मधाचा फेस मास्क

चेहरा चमकदार करण्यासाठी मुलतानी मातीचा वापर बऱ्याच काळापासून केला जात आहे. त्याचबरोबर मध त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर आहे. तर हा फेस मास्क बनवण्यासाठी 1 चमचा मुलतानी माती घ्या आणि त्यात अर्धा चमचा मध मिक्स करून त्याची पेस्ट तयार करा आणि संपूर्ण चेहऱ्यावर चांगले लावा. 15-20 मिनिटांनी चेहरा धुवा. यामुळे त्वचेवरील अतिरिक्त तेल निघून जाते आणि त्वचा चमकदार आणि स्वच्छ होते.

लिंबू आणि बेसनाचा फेस मास्क

चेहऱ्यावरील हरवलेला चमक परत आणण्यासाठी लिंबू आणि बेसनाचा फेस मास्क हा देखील सर्वोत्तम मार्ग आहे. या मास्कच्या वापरामुळे त्वचा चमकदार आणि घट्ट होते. कारण यातील लिंबू त्वचेला डिटॉक्सिफाय करते आणि तेल नियंत्रित करते. दुसरीकडे बेसन चेहऱ्यावरील घाण काढून त्वचा स्वच्छ करते. तुम्हाला फक्त अर्धा चमचा लिंबाचा रस 1 चमचा बेसनात मिक्स करून घ्या. त्यानंतर त्यात गरजेनुसार गुलाबपाणी टाकून पेस्ट बनवून चेहऱ्यावर लावा आणि 15 मिनिटांनी धुवा.

टोमॅटो आणि तांदळाच्या पिठाचा फेस मास्क

चेहऱ्यावरील टॅनिंग दूर करण्यासाठी टोमॅटो सर्वात उपयुक्त आहे. अशातच तांदळाचे पीठ चेहऱ्यावरील घाण साफ करते आणि त्वचा स्वच्छ करते. याचा मास्क बनवणे देखील खूप सोपे आहे. एका भांड्यात 1 चमचा टोमॅटोचा रस घ्या आणि त्यात 1 चमचा तांदळाचे पीठ मिक्स करा आणि हा मास्क चेहऱ्यावर लावा आणि सुकल्यावर हलक्या हाताने स्क्रब करून धुवा.

ग्रीन टी आणि दही फेस मास्क

ग्रीन टी केवळ वजन कमी करण्यासाठीच नाही तर चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी देखील उपयुक्त आहे. त्यात अँटीऑक्सिडंट्स असतात जे त्वचेला ताजेतवाने बनवतात. तर दही त्वचा चमकदार आणि मऊ बनवते. यासाठी 1 चमचा कोल्ड ग्रीन टी घ्या आणि त्यात 1 चमचा दही मिसळा आणि पेस्ट बनवा. पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि 15मिनिटांनी कोमट पाण्याने धुवा.

पावसाळ्याच्या दिवसात त्वचेच्या निस्तेज आणि तेलकट त्वचेच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी हे घरगुती फेसमास्क वापरल्याने कोणत्या दुष्परिणामशिवाय त्वचेची चमक नैसर्गिकरित्या परत मिळवता येते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

चुकूनही ‘या’ अंकुरलेल्या भाज्या खाऊ नका, तुमच्या आरोग्यासाठी ठरेल विषारी…. चुकूनही ‘या’ अंकुरलेल्या भाज्या खाऊ नका, तुमच्या आरोग्यासाठी ठरेल विषारी….
निरोगी राहण्यासाठी योग्य आहार घेणे किती महत्त्वाचे आहे हे आपल्या सर्वांना माहित आहे. लोक पोषण वाढवण्यासाठी त्यांच्या ताटात अनेक प्रकारच्या...
भोपळ्याच्या बिया खाल्ल्यामुळे तुमचं वजन खरच कमी होतं का?
Thane News – बदलापूरमध्ये भरधाव ट्रकची 3 ते 4 वाहनांना धडक, दोघांचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीत कैद
कोळी बांधवांना हुसकावण्याची भाषा करत असाल तर शिवसेना तो अन्याय तोडून मोडून टाकल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरे यांनी ठणकावले
Maghi Ganeshotsav 2025 – कोर्टाच्या कचाट्यातून बाहेर, 177 दिवसांनी होणार चारकोपच्या राजाचं विसर्जन
प्रज्वल रेवण्णाला कोर्टाचा दणका, बलात्कारप्रकरणी ठोठावली जन्मठेपेची शिक्षा
अमेरिकेत पुन्हा अंदाधुंद गोळीबार, चौघांचा मृत्यू; आरोपीचा शोध सुरू