घटस्फोटित पत्नीला पेन्शनची 60 टक्के रक्कम, कोलकाता उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
कोलकाता उच्च न्यायालयाने पतीला त्याच्या घटस्फोटित पत्नीला पेन्शनची 60 टक्के रक्कम पोटगी म्हणून देण्याचे आदेश दिले आहेत. ही रक्कम 25 हजार रुपये आहे. तसेच त्यात दर दोन वर्षांनी पाच टक्के वाढ करण्यास सांगितले आहे.
पती एका बँकेत कामाला होता. कामाच्या ताणामुळे त्याने राजीनामा दिला. नोकरीत असताना त्याचा पगार 1 लाख 30 हजार रुपये होता. मात्र आता त्याची पेन्शन 42 हजार रुपये आहे. त्यापैकी 25 हजार रुपये न्यायालयाने पत्नीला द्यायला सांगितले आहेत. 2023 साली हे प्रकरण मॅजिस्ट्रेट कोर्टात पोहोचले, तेव्हा पत्नीने उलट तपासणीत कबूल केले होते की, तिचा पती आता निवृत्त झाला आहे आणि ती पतीच्या घरात राहते. तसेच तिला अन्य आर्थिक लाभ मिळत आहेत.
पत्नीने दिलेल्या अन्य पुराव्यांची उलट तपासणी करून मॅजिस्ट्रेट कोर्टाने मूळ वैवाहिक प्रकरणात देण्यात येणारी भरणपोषणाची रक्कम 30 हजार रुपयांवरून 25 हजार रुपये इतकी कमी केली होती. मात्र 2024 साली पत्नीने पुन्हा कोलकाता उच्च न्यायालयात अपील केले. पती शेअर बाजार, भविष्य निर्वाह निधी, ग्रॅज्युएटी आदी स्रोतामधून कमावतो. तसेच वरिष्ठ बँक अधिकारी म्हणून त्याला सेवानिवृत्तीचे लाभही मिळत आहेत, असा युक्तिवाद पत्नीच्या वकिलाने केला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List