मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात नो एन्ट्री !
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे यांना आता मंत्रिमंडळात नो एन्ट्री असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. त्यामुळे मुंडे यांच्या मंत्रिमंडळातील पुन्हा समावेशाच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्रिपद गमावल्यानंतर धनंजय मुंडे यांनी पुन्हा लाल दिवा मिळवण्यासाठी धडपड सुरू केली आहे. मागच्या दोन दिवसांत धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यामुळे त्यांच्या मंत्रिमंडळातील पुनर्प्रवेशाची चर्चा सुरू झाली. परंतु पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला. धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात नो एन्ट्री असल्याचे फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले.
धनंजय मुंडे यांनी या आठवड्यात तीन वेळा आपली भेट घेतली. परंतु तीनही वेळा आमची वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली. या भेटीत मंत्रिमंडळातील समावेशाबद्दल चर्चा झाली नाही. मंत्रिमंडळ समावेशाची चर्चा धनंजय मुंडे यांच्या स्तरावर होत नाही, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List