गोरेगावच्या सिद्धार्थ रुग्णालयाचे काम वेगाने करा, तातडीने सुविधा द्या! शिवसेनेची जोरदार मागणी
गोरेगाव पश्चिम येथील सिद्धार्थ हॉस्पिटल गेल्या अनेक महिन्यांपासून नूतनीकरणाच्या नावाखाली बंद असल्याने परिसरातील गोरगरीब रुग्णांना दूरच्या ठिकाणी उपचारासाठी जावे लागत असल्याने मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे पालिकेने हॉस्पिटलचे काम वेगाने पूर्ण करून गोरेगाववासीयांना अद्ययावत सुविधा उपलब्ध करून द्या, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.
शिवसेनेचे माजी नगरसेवक दिलीप शिंदे यांनी आज सिद्धार्थ रुग्णालयाच्या ठिकाणी भेट देऊन कामाचा आढावा घेतला. हे काम एप्रिल 2023 मध्ये सुरू झाले आहे. रुग्णालयाचे सध्या सुरू असलेले काम पाहता डेडलाइनआधी काम पूर्ण होणे कठीण असल्याचे दिसत असल्याचे दिलीप शिंदे म्हणाले. रुग्णालयाच्या कामासाठी लागणाऱया परवानग्या ‘म्हाडा’कडून रखडवण्यात आल्यामुळेच कामाला उशीर होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
काम रखडवणाऱया कंत्राटदाराला दंड
सिद्धार्थ रुग्णालयाच्या बांधकाम रखडवल्याबद्दल संबंधित कंत्राटदाराला दंड आकारण्यात आला आहे. दरम्यान, गोरेगाव पश्चिम येथील नागरिकांसाठी हे महत्त्वाचे रुग्णालय बंद असल्याने गरजूंना आवश्यक उपचार घेण्यासाठी ट्रॉमा केअर सेंटर किंवा कूपर रुग्णालयात जावे लागते. मात्र ट्रॉमा केअर सेंटरमधील गैरसोयी, डॉक्टरांची कमतरता आणि कूपर रुग्णालयावर येणाऱया ताणामुळे गोरगरीब रुग्णांची मोठी हेळसांड होत असल्याचे दिलीप शिंदे म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List