दादर कबूतरखाना बंद करू नका! पक्षीप्रेमींनी पालिकेच्या पथकाला रोखले
कबूतरखान्यात पक्ष्यांना कोणतेही खाद्य घालू नये, असे न्यायालयाने निर्देश देऊनही त्याचे सर्रास उल्लंघन होत असल्यामुळे पालिकेने आज दादर येथील कबूतरखाना बंदिस्त करण्याची कार्यवाही रात्री उशिरा सुरू केली. मात्र हा प्रकार पक्षीप्रमींच्या लक्षात येताच कबूतरखान्याजवळ मोठा जमाव जमला. कबूतरखाना बंद करू नका, अशी मागणी यावेळी पक्षीप्रमींकडून करण्यात आली.
कबूतरांच्या विष्ठsमुळे आणि पिसांमुळे आरोग्याला गंभीर धोका निर्माण होत असल्याचे कारण देत पालिकेला शहरातील
कबूतरखाने बंद करण्याचे निर्देश सरकारने दिले होते. यानुसार पालिकेच्या माध्यमातून आवश्यक उपाययोजना करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. आज रात्री उशिरा दादरचा कबूतरखाना पत्रे लावून बंदिस्त करण्यासाठी पालिकेचे पथक आले असता पक्षीप्रमींनी त्यांना तीव्र विरोध केला. कबूतरखाना बंद करू देणार नाही, अशी जोरदार घोषणाबाजी यावेळी सुरू होती.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List