Photo – उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईसह राज्यभरात विद्यार्थ्यांचा गुणगौरव, वह्यावाटप, ज्येष्ठ नागरिकांसाठी मनोरंजन आणि धार्मिक पर्यटन, वृक्षारोपण अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमांना भरघोस प्रतिसाद मिळत आहे.
शिवसेनेचे अंधेरी पश्चिम विधानसभा संघटक संजय मानाजी कदम व प्रियदर्शनी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. उज्जय जाधव यांच्या सहकार्याने शाखा क्र. 70च्या शाखा संघटक अॅड. छाया खानदेशी यांच्यातर्फे महिलांसाठी आरोग्य शिबीर आयोजित केले होते. यावेळी अनिता बागवे, वीणा टॉक, ज्योत्स्ना दिघे, भावना मांगेला, शरद जाधव, प्रतिभा पाटील, लीना त्रिवेदी, राजेश नारकर, संजय जाधव, आनंदा चव्हाण, गणपत महाडिक, रमेश वांजळे, अनिता शिरसकर आदी यावेळी उपस्थित होते.
ईशान्य मुंबईचे विभागप्रमुख सुरेश पाटील यांच्या आदेशाने शाखा क्र. 133 येथे आभा कार्ड, आयुष्मान कार्ड व ई-श्रम कार्ड यांचे वाटप करण्यात आले. तसेच ‘मशाल’ या चिन्हाचे किचेन बनवून त्यांचेही वाटप करण्यात आले. विधानसभाप्रमुख अवी राऊत, उपविभागप्रमुख अजित भायजे, विधानसभा समन्वयक हृदयनाथ राणे, ग्राहक संरक्षण कक्षाचे चिटणीस रमेश सावंत, उपविभाग संघटक शपुंतला शिंदे, सुनील भोस्तेकर, संतोष पिंगळे, राजू पिंपळे, निशिता जोशी आदी यावेळी उपस्थित होते.
वाळकेश्वर येथील शिवसेना शाखा क्र.219 तर्फे मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला ग्राहक संरक्षण कक्षाचे बळीराम मोसमकर, शाखा संघटक योगिता पेंढारकर, उपशाखाप्रमुख गणेश लांबोरे, अमर चौहान, अरुण सावंत, शशी सावंत, अतुल गोळे, महेंद्र पाथरकर आदी उपस्थित होते. शिबिराचे आयोजन शाखाप्रमुख राजेंद्र गायकवाड यांनी केले होते.
शिवसेना नेते, विभागप्रमुख-आमदार अॅड. अनिल परब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना शाखा क्र. 84च्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तूंचे वाटप करण्यात आले. शाखाप्रमुख प्रकाश सपकाळ यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला विलेपार्ले विधानसभा समन्वयक नितीन डिचोलकर, चंद्रकांत पवार, आनंद पाठक यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List