अमेरिकेत पुन्हा अंदाधुंद गोळीबार, चौघांचा मृत्यू; आरोपीचा शोध सुरू
अमेरिकेत गोळीबाराच्या घटना थांबण्याचे नावच घेताना दिसत नाहीत. मोंटाना राज्यातील अॅनाकोंडा शहरातील ‘द आउल बार’मध्ये अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाला आहे. गोळीबार केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. हल्लेखोराचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी मोठी शोध मोहीम सुरू केली आहे.
हल्ला कोणत्या कारणातून करण्यात आला याबाबत अद्याप माहिती समोर आली नाही. मोंटाना डिव्हिजन ऑफ क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन गोळीबाराच्या घटनेचा तपास करत आहे. हल्लेखोर अद्याप फरार आहे. तो शेवटचा अॅनाकोंडाच्या पश्चिमेला असलेल्या सेंट लॅम्प टाउन परिसरात दिसला होता. पोलीस आणि तपास एजन्सींचे अधिकारी आसपासच्या जंगलात हल्लेखोराचा शोध घेत आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List