Jammu Kashmir – रियासीमध्ये भूस्खलन, पिता-पुत्राचा मृत्यू; सहा जण जखमी
जम्मू-कश्मीरमधील रियासा जिल्ह्यात शनिवारी रात्री उशिरा भूस्खलन झाले. या दुर्घटनेता उपविभागीय दंडाधिकाऱ्यांसह त्यांच्या मुलाचा मृत्यू झाला. तर अन्य सहा जण जखमी झाले. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.
मयत उपविभागीय दंडाधिकारी राजिंदर सिंह हे 2011 च्या बॅचचे जेकेएएस अधिकारी आणि रामनगरचे एसडीएम होते. ते त्यांच्या कुटुंबासह पट्टैयन येथील त्यांच्या मूळ गावी परतत होते. कुटुंबासह एसयूव्हीमध्ये प्रवास करत असताना धर्मारी येथील सालुख इख्तर नाल्याजवळ भूस्खलन झाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List