मुंबईमध्ये प्रॉपर्टी रजिस्ट्रेशनचा नवा रेकॉर्ड, स्टॅम्प ड्युटीतून सरकारच्या तिजोरीत 6,727 कोटी
देशातील सर्वात मोठा आणि महागडा प्रॉपर्टी बाजार मुंबईत आहे. मुंबईतील घरांच्या किमती कोट्यवधींच्या घरात असूनही ग्राहकांची याला जोरदार मागणी आहे. मुंबईत 2025 मध्ये अवघ्या सहा महिन्यांत 75 हजार 933 प्रॉपर्टीची खरेदी-विक्री झाली आहे. ही आकडेवारी गेल्या वर्षीच्या तुलनेत 5 टक्के अधिक आहे. मुंबईत रजिस्ट्रेशनचा नवा रेकॉर्ड झाला असून स्टॅम्प ड्युटीमधून सरकारच्या तिजोरीत तब्बल 6 हजार 727 कोटी रुपये जमा झाले आहेत.
वार्षिक सरासरीच्या तुलनेत ही आकडेवारी 15 टक्के अधिक आहे, अशी माहिती इन्स्पेक्टर जनरल ऑफ रजिस्ट्रेशन आणि कंट्रोलर ऑफ स्टाम्प्सच्या आकडेवारीतून समोर आली आहे. मुंबईत दर महिन्याला 11 हजारांहून अधिक रजिस्ट्रेशन होत आहेत. मध्यम किमतीच्या घरांची मागणी थोडी कमी झाली आहे, परंतु मोठ्या घरांची आणि 5 कोटींपेक्षा जास्त प्रॉपर्टीची मागणी वाढली आहे. जूनमध्ये प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन 11,521 झाले.
मुंबईत 500 ते 1 हजार स्क्वेअर फुटांच्या घरांना सर्वात जास्त मागणी आहे. खरेदीत याची भागीदारी 44 टक्क्यांवरून आता 45 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे, तर 500 स्क्वेअर फुटांच्या घरांचीही मागणी वाढली आहे. मुंबईतील पश्चिम आणि मध्य उपनगरातील रेसिंडेशियल मार्केटची मागणी वाढली आहे. आरबीआयने गेल्या महिन्यात रेपो रेटमध्ये केलेल्या कपातीचा फायदा अनेकांना झाला आहे. होम लोन आधीच्या तुलनेत स्वस्त झाल्याने खरेदी-विक्री वाढली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List