विधानसभा निवडणुकीत सरकारी गाड्यांमधून पैसे वाटले गेले, भाजप प्रवेशानंतर कैलास गोरंट्याला यांचा धक्कादायक खुलासा
जालनाचे काँग्रेसचे माजी खासदार कैलाश गोरंट्याल यांनी गुरुवारी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप प्रवेशानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना गोरंट्याल यांनी विधानसभा निवडणूकीबाबत धक्कादायक खुलासा केला आहे.
”निवडणूकांमध्ये हल्ली भरमसाट पैशांचा वापर करू होऊ लागला आहे. आमच्या मतदारसंघात 100 कोटीपेक्षा जास्त खर्च झाला. निवडणूकीत पैशांच्या वापरावर निवडणूक आयोगाने जसं बंधन घातलं पाहिजे पण तसं काही होत नाही. निवडणूक आयोगाकडे पैशांचे फोटो व्हिडीओ क्लिप पाठवून तक्रार केली तरी त्याचा काही उपयोग होत नाही. निवडणूक आयोगात जेव्हा टी सेशन सारखे आयुक्त असते तर असं काहीही होऊ शकलं असतं, असं गोरंट्याल म्हणाले.
यावेळी बोलताना गोरंट्याला यांनी विधानसभा निवडणूकीतील पैसे वाटपावरही वक्तव्य केलं. ”या विधानसभा निवडणूकीत सरकारी गाड्यांमधून पैसे आले. शंभर लोकं पैसे वाटत असताना किती लोकांना पकडणार? प्रत्येक गल्लीत दोन लोकं पैसे वाटत होते. मला असं वाटतं लोकांचं परिवर्तन होत नाहीय. हल्ली लक्ष्मी नारायण भेटत नाही तोपर्यंत लोकं मतदान करत नाही’, असं गोरंट्याल म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List