सरदार पटेल पंतप्रधान असते तर तुम्हाला देशातून उखडून फेकले असते, संजय राऊत यांचा भाजपवर घणाघात

सरदार पटेल पंतप्रधान असते तर तुम्हाला देशातून उखडून फेकले असते, संजय राऊत यांचा भाजपवर घणाघात

ऑपरेशन सिंदूरवर आज राज्यसभेत चर्चा सुरू आहे. या चर्चेवेळी बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपला फटकारले आहे. ” ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरू असताना अनेकदा पंडीत नेहरू व सरदार पटेल यांचा उल्लेख झाला. भाजपने पंडीत जवाहरलाल नेहरू यांचे आभार मानले पाहिजे त्यांच्यामुळेच आज ते सत्तेत आहेत. जर सरदार पटेल पंतप्रधान झाले असते तर त्यांनी तुम्हाला देशातून उखडून फेकले असते”, असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.

”पहलगाममध्ये 26 जणांची हत्या झाली. ती कशी झाली हे सरकार अद्याप सांगू शकलेले नाही. संपूर्ण जम्मू कश्मीर सरकारच्या अधीन आहे. 370 हटलविल्यानंतर कश्मीरला केंद्रशासित बनवलं. तिथली पोलीस गृहमंत्रालयाच्या आदेशांचं पालन करतात. आर्म फोर्स अॅक्ट लावला आहे. तिथले राज्यपालही तुमचे आहेत. तरीही हल्ला झाला व हल्लेखोर पळून गेले. राज्यपालांनी देखील आपली चूक मान्य केली. ते म्हणाले की सुरक्षेत चूक झाली. जर त्यांनी हे मान्य केले मग याची जबाबदारी कोण घेणार? कोण राजीनामा देणार? पंडीत नेहरू राजीनामा देणार की डोनाल्ड ट्रम्प राजीनामा देणार? असा खोचक टोला संजय राऊत यांनी भाजपला लगावला.

”या हल्ल्याची जबाबदारी देशाच्या गृहमंत्र्यांची होती व त्यांनी राजीनामा द्यायला हवा होता. या देशात तुमचे ऐकले नाही म्हणून 24 तासात उपराष्ट्रपतींचा राजीनामा घेतला जातो. मात्र 26 लोकांची हत्या होऊनही कुणाचा राजीनामा नाही कुणी माफी मागितली नाही. ही या देशाची स्थिती आहे. आदरनीय प्रधानममंत्री स्वत:ला देवाचा अवतार मानताताय. ते बोलतात में समय से पेहले आनेवाले कल को भांप लेता हूँ मग हा एवढा मोठा हल्ला का नाही ओळखला त्यांनी, असा सवाल भाजपला केला.

”राजनाथ सिंह,जेपी नड्डा, आपले परराषट्र मंत्री यांना पंडीत नेहरू, सरदार पटेल यांची खूप आठवण येत होती. तुम्ही भूतकाळात खूप फिरता. पंडीत नेहरू त्यांना झोपूही देत नाही, आणि जगूही देत नाहीत. सरदार पटेलांचीही यांना आठवण येते. नेहरू तर महान होतेच. पण सरदार पटेलांना पंतप्रधान न करून आपण खूप ऐतिहासिक चूक केली. सरदार पटेल असे नेते होते ज्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घातली होती. जर सरदार पटेल अजून दहा वर्ष जिवंत असते तर हे लोकं समोर दिसले नसते. भाजपने पंडीत नेहरूंचे आभार मानले पाहिजे की त्यांच्यामुळे तुम्ही सत्तेत आहेत. राज करताय. ही पंडीत नेहरूंची मेहेरबानी आहे. जर सरदार पटेल पंतप्रधान असते तर हे लोकं सत्तेत काय देशातही दिसले नसते. उखडून फेकून दिले असते यांना, असे संजय राऊत म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने खाल्ल्याने आरोग्यावर कसा परिणाम होतो हे तज्ज्ञांकडून जाणून घेऊया. रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने खाल्ल्याने आरोग्यावर कसा परिणाम होतो हे तज्ज्ञांकडून जाणून घेऊया.
आयुर्वेदात कडुलिंबाला फक्त एक झाडच नाही तर एक नैसर्गिक औषध मानले जाते. ते ‘सर्व रोग निवारणी’ म्हणजेच सर्व रोगांचे उच्चाटन...
दिल्ली-लंडन एअर इंडिया बोईंग ड्रीमलाइनरमध्ये तांत्रिक बिघाड, उड्डाण रद्द
महादेव मुंडे यांच्या हत्येप्रकरणी SIT स्थापन करण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश
Ratnagiri News – जिल्ह्याची कंत्राटी आरोग्य यंत्रणा पगाराविना, 106 बीएएमएस डॉक्टरांचे चार महिन्याचे पगार थकले
मोदींचे मित्र ट्रम्प यांचा हिंदुस्थानला धक्का! गोयल म्हणाले, 10-15 टक्के टॅरिफची चर्चा झाली होती
उर्वशी रौतेलाचे 70 लाखांचे सोन्याचे दागिने चोरीला, लंडन एअरपोर्टवरून बॅग गायब
Video – पहलगाम हल्ल्यातील विधवांना कसे सांगणार पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळायचे आहे?