रेल्वेतील जेवण निकृष्ट, प्रवाशांच्या तक्रारी वाढल्या; एका वर्षात तब्बल 6645 तक्रारी, रेल्वेमंत्र्यांची कबुली

रेल्वेतील जेवण निकृष्ट, प्रवाशांच्या तक्रारी वाढल्या; एका वर्षात तब्बल 6645 तक्रारी, रेल्वेमंत्र्यांची कबुली

रेल्वेतील जेवण निकृष्ट असल्याच्या अनेकदा तक्रारी येतात. 2024-25 या आर्थिक वर्षात तर अशा तब्बल 6645 तक्रारी आल्या. प्रवाशांच्या वाढत्या तक्रारींमुळे रेल्वेतील खानपान सेवेच्या गुणवत्तेवर पुन्हा एकदा मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रेल्वेतील निकृष्ट दर्जाच्या जेवणाबद्दल किती तक्रारी आल्या, याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी शुक्रवारी राज्यसभेत लेखी प्रश्नाला उत्तर देताना दिली.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे खासदार जॉन ब्रिटास यांनी रेल्वेतील जेवणाचा दर्जा आणि कंत्राट वाटपातील पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित केले होते, ज्यावर रेल्वेमंत्र्यांनी सविस्तर उत्तर दिले. प्राप्त झालेल्या एकूण 6645 तक्रारींवर विविध स्तरांवर कारवाई करण्यात आली आहे. या 1341 प्रकरणांमध्ये अन्न पुरवठादारांवर दंड ठोठावण्यात आला. 2023-24 या वर्षी 7026 तक्रारी आल्या होत्या. 2022-23 या वर्षात 4421 तक्रारी व 2021-22 या वर्षी 1082 तक्रारी नोंदवण्यात आल्या.

कारवाई काय झाली…

  • 2995 प्रकरणांमध्ये संबंधित कंत्राटदारांना कडक शब्दांत ताकीद देण्यात आली. 547 प्रकरणांमध्ये दर्जा सुधारण्यासाठी योग्य सल्ला आणि सूचना देण्यात आल्या.
  • भेसळयुक्त किंवा अस्वच्छ अन्नाची तक्रार आल्यास त्वरित दंडात्मक कारवाई केली जाते. तसेच जेवणाचा दर्जा टिकवून ठेवण्यासाठी आणि सुधारण्यासाठी रेल्वे मंत्रालय अनेक उपाययोजना करत असल्याचेही रेल्वेमंत्र्यांनी सांगितले.
Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

धनखड उपराष्ट्रपती असताना त्यांना नाकारली होती बुलेटप्रूफ गाडी, सहा महिने केला इनोव्हातून प्रवास धनखड उपराष्ट्रपती असताना त्यांना नाकारली होती बुलेटप्रूफ गाडी, सहा महिने केला इनोव्हातून प्रवास
केंद्रीय गृह मंत्रालयाने तत्कालीन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना बुलेटप्रूफ गाडी नाकारण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. राजीनामा देईपर्यंत तब्बल...
तामीळनाडूत भाजपला धक्का, ओपीएस यांचा पक्ष एनडीएतून बाहेर
रोहिंग्या, बांगलादेशी म्हणत जमाव कारगील योद्ध्याच्या घरात घुसला!
ट्रम्प सत्यच बोलले! मोदींनी अदानीसाठी देश रसातळाला नेला, राहुल गांधी यांचा हल्ला
बेस्टने निवृत्त कर्मचाऱ्यांचे 493 कोटी रुपये थकवले! ग्रॅच्युईटी व इतर अंतिम देयके देण्यास टाळाटाळ
गद्दारांना रोखले नाही तर लोकशाहीचे नुकसान होईल! पक्ष बदलणाऱ्या आमदारांच्या अपात्रतेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
हिंदुस्थानी अर्थव्यवस्था ‘मेलीय’, ट्रम्प यांचा मोदींना धक्का, अमेरिकेचा पाकिस्तानशी मोठा तेल करार