साईबाबांवरील वक्तव्याचा वाद चिघळला; शिर्डी ग्रामस्थ आक्रमक, अरुण गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल

साईबाबांवरील वक्तव्याचा वाद चिघळला; शिर्डी ग्रामस्थ आक्रमक, अरुण गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल

श्री साईबाबांनी त्यांच्या अखेरच्या क्षणी त्यांच्या भक्त, सेविका लक्ष्मीबाई शिंदे यांना दिलेली चांदीची नऊ नाणी नेमकी कोणाकडे आहेत, यावरून निर्माण झालेला वाद आता गंभीर वळणावर पोहोचला आहे. या प्रकरणात साईभक्त लक्ष्मीबाई ट्रस्टचे अध्यक्ष अरुण गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत साईबाबांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले असून, धार्मिक भावना दुखावल्याच्या कारणावरून गायकवाड यांच्याविरोधात शिर्डी ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

धर्मादाय आयुक्तांनी नाण्यांच्या मालकी हक्कासंदर्भात दिलेल्या निर्णयानुसार, सदर नाणी अरुण गायकवाड यांच्या ट्रस्टकडे असल्याचे नमूद केले आहे. याबाबत गायकवाड त्यांनी पत्रकार परिषदेत दावा करताना, ‘आमच्याकडीलच नाणी खरी असून, शिंदे कुटुंबाकडील नाणी बनावट आहेत,’ असे वक्तव्य केले. तसेच ‘साईबाबांचा डीएनए करा म्हणजे सत्य समोर येईल,’ असेही म्हटल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.

या वक्तव्याच्या निषेधार्थ शिर्डी ग्रामस्थांनी गायकवाड यांच्या विरोधात जोरदार आंदोलने केली. त्यांच्या घर, दुकानासमोर आंदोलन करत त्यांच्या फोटोवर शाई ओतून निषेध नोंदवण्यात आला. याप्रकरणी गायकवाड यांनी आंदोलनाआधीच एक व्हिडीओ प्रसिद्ध करून सार्वजनिकरीत्या माफी मागितली असली, तरी ग्रामस्थांचा संताप शमलेला नाही.
याप्रकरणी शिर्डी पोलिसांनी धार्मिक भावना दुखावल्याचा ठपका ठेवून अरुण गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल केला. गायकवाड यांनी नाण्यांबाबत खोटी माहिती देऊन साईभक्तांची फसवणूक केल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. माजी नगराध्यक्ष कैलास कोते यांनी गायकवाड यांच्याविरोधात फिर्याद दिली आहे.

या फिर्यादीत शिवाजी गोंदकर, कलमाकर कोते, अभय शेळके, सचिन तांबे, नीलेश कोते, बाबासाहेब कोते, सर्जेराव कोते, संजय शिंदे, नितीन कोते, ताराचंद कोते, सुजित गोंदकर, संदीप सोनवणे, दीपक वारुळे, योगेश जगताप, प्रमोद गोंदकर, कैलास आरणे, किरण बडे, अविनाश गोंदकर, प्रसाद लोढा, विकास गोंदकर, अनुप गोंदकर, राजेंद्र भुजबळ, गणेश कोते, सचिन कोते, नरेश सुराणा, यांच्यासह ग्रामस्थांच्या धार्मिक भावना दुखावल्याचे म्हटले आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

धनखड उपराष्ट्रपती असताना त्यांना नाकारली होती बुलेटप्रूफ गाडी, सहा महिने केला इनोव्हातून प्रवास धनखड उपराष्ट्रपती असताना त्यांना नाकारली होती बुलेटप्रूफ गाडी, सहा महिने केला इनोव्हातून प्रवास
केंद्रीय गृह मंत्रालयाने तत्कालीन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना बुलेटप्रूफ गाडी नाकारण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. राजीनामा देईपर्यंत तब्बल...
तामीळनाडूत भाजपला धक्का, ओपीएस यांचा पक्ष एनडीएतून बाहेर
रोहिंग्या, बांगलादेशी म्हणत जमाव कारगील योद्ध्याच्या घरात घुसला!
ट्रम्प सत्यच बोलले! मोदींनी अदानीसाठी देश रसातळाला नेला, राहुल गांधी यांचा हल्ला
बेस्टने निवृत्त कर्मचाऱ्यांचे 493 कोटी रुपये थकवले! ग्रॅच्युईटी व इतर अंतिम देयके देण्यास टाळाटाळ
गद्दारांना रोखले नाही तर लोकशाहीचे नुकसान होईल! पक्ष बदलणाऱ्या आमदारांच्या अपात्रतेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
हिंदुस्थानी अर्थव्यवस्था ‘मेलीय’, ट्रम्प यांचा मोदींना धक्का, अमेरिकेचा पाकिस्तानशी मोठा तेल करार