शनिभक्तांची फसवणूक करून दोन कर्मचारी झाले करोडपती; शनी शिंगणापूर बनावट अॅप प्रकरण

शनिभक्तांची फसवणूक करून दोन कर्मचारी झाले करोडपती; शनी शिंगणापूर बनावट अॅप प्रकरण

शनिशिंगणापूर देवस्थानशी संबंधित बनावट ऍप प्रकरणाच्या चौकशीतून खळबळजनक माहिती समोर आली आहे. ऍपच्या माध्यमातून शनिभक्तांची फसवणूक करून तब्बल एक कोटी रुपयांची रक्कम शनैश्वर संस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक खात्यावर जमा करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

विधिमंडळ अधिवेशनात प्रश्न उपस्थित झाल्यानंतर पोलिसांनी स्वतःहूनच शनिशिंगणापूर (ता. नेवासा) येथील श्री शनैश्वर देवस्थानच्या बनावट ऍप प्रकरणात पाच अॅपधारकांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. सायबरचे उपनिरीक्षक सुदाम काकडे यांनी फिर्याद दिली आहे. संबंधित गुह्याच्या अनुषंगाने सायबर पोलिसांनी तपास केला. यात शनैश्वर संस्थानने परवानगी दिलेली तीन आणि बनावट चार ऍप अशा एकूण सात ऍपचा समावेश असून, या ऍपची चौकशी करण्यात आली. बनावट ऍपचे डेव्हलपर्स, ऑपरेटर यांची चौकशी केली. ऍपवर 500, 1800, पाच हजार अशा रकमा जमा आहेत. ऍपच्या माध्यमातून संस्थानला काय फायदा झाला, यादृष्टीनेही तपास करण्यात आला. बनावट ऍप तयार करणारे बाहेरचे आहेत. दोन्ही ऍपचे भाविकांच्या दर्शनाचे रेट वेगवेगळे आहेत.

शनैश्वर देवस्थानने परवानगी दिलेल्या तीन व बनावट चार ऍपमधून संस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांच्या खात्यावर तब्बल एक कोटी रुपये जमा झाल्याचे उघडकीस आले आहे. ऍपमध्ये अनेकांचा सहभाग असू शकतो, असे निदर्शनास आल्याचे घार्गे यांनी सांगितले. यावेळी उपविभागीय अधिकारी अमोल भारती, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी उपस्थित होते.

सीईओ दरंदले यांची चौकशी, विश्वस्तांच्या खात्यावर पैसे नाहीत
श्री शनैश्वर देवस्थान बनावट ऍप प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर संस्थानचे सीईओ दरंदले यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. त्यांच्याकडून काही माहिती घेतली. संस्थानने परवानगी दिलेल्या आणि बनावट ऍपमधून संस्थानला किती फायदा झाला, याची त्यांना माहिती विचारली. दरंदले यांच्याकडून अद्यापि ही माहिती मिळालेली नाही. टेक्निकल पद्धतीने तपास सुरू असून, अजून कोणालाही आरोपी केलेले नाही. तसेच सायबर पथकाच्या चौकशीतून देवस्थान विश्वस्तांच्या बँक खात्यावर पैसे जमा झाल्याचे निदर्शनास आले नसल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सांगितले.

अयोध्या, वैष्णोवदेवी दर्शनासाठीही अॅप
शनिशिंगणापूर येथे श्री शनैश्वर देवस्थान बनावट ऍपचे प्रकरण समोर आले असतानाच, आता या प्रकरणामध्ये अयोध्या, वैष्णोवदेवी, काशी विश्वेश्वर या देवस्थानच्याही नावाचा उल्लेख आहे. तेथील दर्शनासाठी अॅप असल्याचे तपासातून समोर आले आहे. संबंधित ऍपमधून संबंधित देवस्थानची फसवणूक होते की काय, याबाबत त्यांना पत्र देणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक घार्गे यांनी सांगितले.

एलसीबीत काम करणाऱ्यांना पुन्हा संधी नाही
स्थानिक गुन्हे शाखेमध्ये वर्षानुवर्षे राहिलेल्यांना आता बाहेरचा रस्ता दाखविला जाणार आहे. तसेच यापूर्वी स्थानिक गुन्हे शाखेत काम करणाऱ्यांना पुन्हा स्थान दिले जाणार नसल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्पष्ट केले. जिह्यातील गुन्हेगारी गँगची माहिती असणारे, धडाडीचे, पात्रता असणाऱ्यांना स्थान दिले जाणार आहे. स्थानिक गुन्हे शाखेत 2021 मध्ये नेमणुका झाल्या होत्या. आता पुन्हा नव्याने दमदार टीम तयार करणार आहोत, असेही घार्गे यांनी सांगितले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

धनखड उपराष्ट्रपती असताना त्यांना नाकारली होती बुलेटप्रूफ गाडी, सहा महिने केला इनोव्हातून प्रवास धनखड उपराष्ट्रपती असताना त्यांना नाकारली होती बुलेटप्रूफ गाडी, सहा महिने केला इनोव्हातून प्रवास
केंद्रीय गृह मंत्रालयाने तत्कालीन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना बुलेटप्रूफ गाडी नाकारण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. राजीनामा देईपर्यंत तब्बल...
तामीळनाडूत भाजपला धक्का, ओपीएस यांचा पक्ष एनडीएतून बाहेर
रोहिंग्या, बांगलादेशी म्हणत जमाव कारगील योद्ध्याच्या घरात घुसला!
ट्रम्प सत्यच बोलले! मोदींनी अदानीसाठी देश रसातळाला नेला, राहुल गांधी यांचा हल्ला
बेस्टने निवृत्त कर्मचाऱ्यांचे 493 कोटी रुपये थकवले! ग्रॅच्युईटी व इतर अंतिम देयके देण्यास टाळाटाळ
गद्दारांना रोखले नाही तर लोकशाहीचे नुकसान होईल! पक्ष बदलणाऱ्या आमदारांच्या अपात्रतेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
हिंदुस्थानी अर्थव्यवस्था ‘मेलीय’, ट्रम्प यांचा मोदींना धक्का, अमेरिकेचा पाकिस्तानशी मोठा तेल करार