बांगलादेशात राजकीय हालचालींना वेग, खालिया झिया यांनी निवडणूक लढवणार; कधी होणार निवडणुका?
बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे (बीएनपी)उपाध्यक्ष अब्दुल अवल मिंटू यांनी बुधवारी घोषणा केली की, बीएनपी अध्यक्षा खालिदा झिया आगामी निवडणुका लढवतील. फेनी जिल्ह्यातील एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, “जिल्ह्यातील निवडणुकांबद्दल कोणतीही चिंता नाही. आमच्या नेत्या खालिदा झिया आता ठीक आहेत. त्या निवडणूक लढवतील.” बीएनपी जिंकेल असा विश्वास व्यक्त करून ते म्हणाले, “जर निवडणुका पारदर्शक आणि निष्पक्षपणे झाल्या, तर बीएनपी फेनीमध्ये नक्कीच विजय मिळवेल.”
अब्दुल अवल मिंटू म्हणाले, “देशातील सध्याची परिस्थिती पाहता, निवडणुका लवकर होऊ शकतात. जानेवारीमध्येही निवडणूक होण्याची शक्यता आहे. काळजीवाहू सरकारशी संबंधित एक खटला सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. जर न्यायालयाने काळजीवाहू व्यवस्था पुनर्संचयित करण्यास परवानगी दिली, तर हे अंतरिम सरकार काळजीवाहू सरकार म्हणून काम करेल.”
बांगलादेशच्या संविधानानुसार, काळजीवाहू सरकारच्या अंतर्गत 90 दिवसांच्या आत निवडणुका घ्याव्या लागतात. लंडनमध्ये अंतरिम सरकार आणि पक्षाचे काळजीवाहू अध्यक्ष तारिक रहमान यांच्यात झालेल्या बैठकीत सहमतीवर बीएनपीचा विश्वास आहे, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, खालेदा झिया यांनी यापूर्वी 1991 ते 1996 आणि 2001 ते 2006 या कालावधीत बांगलादेशच्या पंतप्रधानपदाची धुरा सांभाळली आहे. त्यांचा राजकीय प्रवास 1981 मध्ये त्यांचे पती आणि माजी राष्ट्राध्यक्ष झियाउर रहमान यांच्या हत्येनंतर सुरू झाला. 2018 मध्ये त्यांना झिया ऑर्फनेज ट्रस्ट भ्रष्टाचार प्रकरणात तुरुंगवासाची शिक्षा झाली होती, परंतु मार्च 2025 मध्ये सुप्रीम कोर्टाने त्यांना या प्रकरणात निर्दोष मुक्त केले. यामुळे त्यांच्या निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List